Decision Making : निर्णयाची जबाबदारी

decision making psychology : समुपदेशक डॉ. सुवर्णा बोबडे निर्णयातील ‘प्राइझ’ आणि ‘प्राइस’ समजून घेण्याचा सल्ला देतात. दोष देण्याऐवजी जबाबदारी स्वीकारल्यास भावनिक स्थैर्य मिळते. खोटी पॉझिटिव्हिटी नको; वास्तव मान्य करून पुढचा मार्ग ठरवणे महत्त्वाचे आहे.
decision making psychology

decision making psychology

sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडेसमुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

प्रत्येक निर्णयाबरोबर काहीतरी मिळतं आणि काहीतरी गमवावं लागतं. लग्न, घटस्फोट, शहर-शिक्षण-नोकरी बदलणं अशा अनेक निवडींना फायदे आणि किंमत दोन्ही असतात.

‘‘डॉक्टर, पॉझिटिव्ह कसं राहायचं ते शिकवाल का?... कारण जे झालंय त्याला सगळेच जबाबदार आहेत... आणि मीसुद्धा.’’ थोडं थांबून ‘ती’ सांगू लागली- ‘‘घरच्यांनी नोकरी सोडण्यासाठी दबाव आणला. ऑफिसमध्येही पाठिंबा मिळाला नाही. परिस्थितीच अशी होती... पण तरीही शेवटी निर्णय तर माझाच होता ना? म्हणून राग येतो स्वत:चा. आणि कोणाला दोष देणार? एवढी शिकली-सवरलेली असताना अशी घरात बसले आहे मी. कुठून नीट सपोर्ट मिळाला असता तर केलं असतं ना मी पण काहीतरी! आणि आता साधं पॉझिटिव्ह राहणंसुद्धा जमत नाही आपल्याला असं वाटतं. मला नव्हतंच घरी बसायचं...’’

तिचे डोळे ओले झाले. पण त्याहून जास्त राग आणि गोंधळ. ‘‘कधी वाटतं, सगळ्यांनी मला अशा परिस्थितीत ढकललं. आणि कधी वाटतं, मीच कमकुवत होते. आता कुणाकडे बोट दाखवावं कळत नाही. सगळे म्हणतात ‘पॉझिटिव्ह रहा’, ‘ॲक्सेप्ट कर’. मला ना स्वीकारता येतंय, ना काही बदलता येतंय.’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com