Fashion For You : तुमच्यासाठी योग्य तीच फॅशन!

आपण आपल्या शरीराच्या आकारानु्सार आणि रुपानुसार कपडे घालावे.
dressing tips for girls
dressing tips for girlsesakal
Summary

आपण आपल्या शरीराच्या आकारानुसार आणि रुपानुसार कपडे घालावे. हे कपडे घातल्यावर आपण आणखी सुंदर दिसू शकतो.

प्रत्येक तरुणीला (Girl's) किंवा स्त्रीला (Women) नेहमी असे वाटते की, आपण जे पण कपडे (Dressing) घालतो त्यात आपण सुंदर दिसायला हवं. अशात महिला आणि युवती त्यांच्या शरीराच्या आकारानुसार कपडे कसे शोधणार याच विचारात असतात? कित्येकदा असे होते की जेव्हा आपण कपडे खरेदी करतो, तेव्हा ते पाहायला सुंदर वाटतात मात्र जेव्हा आपण ते घालतो तेव्हा ते आपल्याला छान दिसत नाही. यावेळी शरीराचा काहीही दोष नसतो.

आपण शरीरानुसार कपडे खरेदी करत नाही, तर आपल्याला जे आवडतात ते आपण खरेदी करतो. ही एक साधारण गोष्ट आहे, मात्र अनेकांना या विषयी माहिती नसते की आपण आपल्या शरीराच्या आकारानुसार आणि रुपानुसार कपडे घालावे. हे कपडे घातल्यावर आपण आणखी सुंदर दिसू शकतो.

dressing tips for girls
Turtle Neck Fashion | असा बदला तुमचा फॅशन गेम! नेहमी रहा अप टू डेट

अॅपल शेप (Apple Shape) : जर तुमचे शरीर अॅपल शेप बॉडी टाइप सारखे असेल तर आपण असे कपडे घालावे की, ज्यामुळे कंबर आणि पोटाच्या भागावर लक्ष जाणार नाही. 'V' गळ्याचा ड्रेस, टॉप किंवा 'A' लाइनचा ड्रेस वापरावा. अशावेळी जीन्स किंवा पँट अजिबात घालू नये, जे तुमच्या स्कीनला चिकटलेली दिसतात आणि त्यामुळे आपले पाय मोठे दिसतात. या शिवाय High-Waisted Shorts सोबत हाई-हील, सॅंडलचा वापर करावा, जेणे करून आपल्या सुंदरतेत आणखी भर पडेल.

पीयर शेप (Pear shape) : जर तुमची कंबर बारीक असेल आणि Hips मोठ्या आकाराचे असेल तर तुमच्या शरीराला Pear Body Shape म्हटले जाते. यात शरीराचा आकार अॅपल शेप बॉडी टाइप च्या Adverse आहे. Pear Body Shape च्या महिलांनी Scoop-Neck किंवा Boat-Neck स्टाइलच्या टॉप्सचा वापर करावा. सोबत गळ्यात स्कार्फ, स्टोल किंवा कलरफूल ज्वेलरी घालू शकता.

dressing tips for girls
गुलाबी थंडीत अशी खुलवा फॅशन

स्ट्रेट फ्लॅट शेप (Straight flat body) : अशावेळी तुम्ही टॉप्स कंबरेपर्यंत घातले पाहिजे. मान आणि खांदे हायलाइट करण्यासाठी स्कार्फ आणि ज्वेलरी वापरू शकता. स्कर्ट, टॉप, जॅकेट तुम्हाला अधिक सुंदर दिसू शकतात. या प्रकारचा बॉडी शेप असलेल्या महिलांनी ट्यूब टॉप (Tube Tops) सारखा ड्रेस घालावा, जेणेकरुन हे कपडे परिधान केल्याने तुम्ही आकर्षक तर दिसताच पण आरामदायी देखील राहाल.

स्लिम बॉडी फ्रॉम वेस्ट (Slim body from waist) : जर तुमच्या शरीराचा आकार सडपातळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही फिरायला जाताना 'v' नेक टॉप आणि ड्रेस घालू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाताना अधिक सुंदर दिसू शकता. या प्रकारच्या शरीराच्या आकाराच्या स्त्रियांनी Tapered Ankle Trouser or Jeans आणि Narrow Shouldered Tops इ. घालू नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com