महिलांना दररोज अनेक आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. प्रेग्नंसीमध्ये शरीराची झालेली झीज, कामामुळे स्वत:कडे केलेलं दुर्लक्ष यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. सध्या वयाची तिशी ओलांडली की महिलांच्या शरीरातील कॅल्शियमही कमी व्हायला लागते.
आरोग्याच्या या तक्रारींचा पाढा वाचत महिलांना दिवस सुरू होतो आणि संपतो. काही मोजक्याच महिला आरोग्याकडे लक्ष देतात. तर अनेकजणी तात्पुरते उपाय करून सोडून देतात. पण आज आम्ही महिलांसाठी अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्याचा फायदा प्रत्येक महिलेला होणार आहे.