
Maha Shivratri 2025 Rangoli: भारतात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री हा भगवान शिव यांना समर्पित सर्वात महत्वाच्या हिंदू सणांपैकी एक आहे. महाशिवरात्रीला शिवभक्त रात्री जागरण आणि शिवपूजा करतात. हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येते. या उत्सवात रात्री चार विशेष प्रहरांची पूजा केली जाते.
शिवभक्त मंदिराची सजावट करतात तसेच घरासमोर सुंदर रांगोळी काढतात. तुम्हाला महाशिवरात्रीला कमी वेळेत सुंदर रांगोळी काढायची असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.