
Curtain Cleaning Hacks: पडदे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतात. जेव्हा तुमच्या घरात लाइट रंगाचे पडदे लावले जातात तेव्हा हे सौंदर्य अधिक दिसून येते. लाइट रंगाचे पडदे लावल्याने घरात चांगला प्रकाश येतो आणि घराचा लूकही नवीन दिसतो.
तसेच त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे. साधारणपणे, पडदे दर 1 ते 2 महिन्यांनी स्वच्छ केले जातात. पण, कधीकधी असं घडतं की चुकून त्यावर डाग राहतात जे साफ करणे एक मोठे काम बनते.