Kitchen Hacks: सकाळी स्वयंपाकाची घाई होतेय? मग या टिप्स वापरा आणि लवकर आवरा

बाहेरचा नाश्ता रोज खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते.
cook
cook sakal

अनेकवेळा सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईमुळे आपल्याला नाश्ता बनवता येत नाही. बराच वेळ लागेल या विचाराने बरेच लोक नाश्ता बनवण्याचा विचार सोडून देतात. बाहेरचा नाश्ता रोज खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते, म्हणूनच घरचा नाश्ता खाणे आरोग्यदायी आहे.

सकाळची वेळ सगळ्यांसाठीच गडबडीची असते. त्यातही महिलांची अधिक घाई गडबड असते. कितीही लवकर उठून स्वयंपाक करायला घेतला तरी बरेचदा उशीर होतो. सकाळी नाश्ता न थकता बनवणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत कामे पटापट आटपावी म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही किचन टिप्स आणल्या आहेत.

cook
Peanut Bhel: फक्त चखण्यालाच नाही तर एरवीही तोंडाला चव आणते शेंगदाण्याची भेळ, सोपी रेसिपी जाणून घ्या

रात्री भाजी चिरून ठेवा

आदल्याच रात्री भाजी चिरुन फ्रीजमध्ये ठेवता येते. असे केल्याने तुमचा बराच वेळ वाचेल. विशेषत: तुम्ही अनेक पदार्थ बनवणार असाल तर हे काम नक्की करा.

राजमा, हरभरा आणि डाळ भिजवून ठेवा

राजमा, हरभरा आणि डाळ अशा गोष्टी आहेत, ज्यांना शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून तुम्ही ते रात्रीच भिजवून ठेवावे. जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागेल. त्यांना भिजवल्याने पोषणमूल्ये वाढते. तसेच पटकन शिजते.

रात्री किचन आवरुन झोपा

जर तुम्ही रात्री किचन साफ ​​करून, आवरुन झोपलात तर सकाळी उठल्यावर तुमचा वेळ तर वाचेल शिवाय तुम्ही पॅनिक होणार नाही. यामुळे तुमची खूप मेहनत वाचेल आणि प्रत्येक सामान जागच्या जागी सापडेल.

cook
Menstrual Health: पीरियड्समध्ये पॅड्सऐवजी या गोष्टी वापरूनही राखता येते स्वच्छता, जाणून घ्या

रात्री झोपताना काय बनवायचे याचा विचार

सकाळी उठून काय बनवायचे याचा विचार केला तर बराच वेळ वाया जाईल. त्यामुळे घरातील लोकांच्या आवडी-निवडींचा विचार करुन रात्रीच ठरवा की तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय बनवायचे आहे. यामुळे घरातील सदस्यांचा मूड आणि तुमचा वेळ दोन्ही वाचेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com