esakal | पचनक्रिया बिघडलीये? आहारात करा कच्च्या कांद्याचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

onion

पचनक्रिया बिघडलीये? आहारात करा कच्च्या कांद्याचा समावेश

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोणतीही मसालेदार, झणझणीत भाजी किंवा उसळ करायची असेल तर त्यासाठी कांदा हमखास लागतोच लागतो. त्यामुळे भारतीय स्वयंपाक घरात अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा हा केवळ फोडणीसाठीच वापरला जातो असं नाही. तर कांद्यापासून अनेक विविध पदार्थ केले जातात. यात कांद्याची कोशिंबीर, कांद्याचं थालीपीठ, कांद्याचं पिठलं अगदी कांद्याची भाजीही केली जाते. विशेष म्हणजे कांद्यामुळे ज्या प्रमाणे पदार्थाची चव वाढते त्याचप्रमाणे त्याचे अनेक शारीरिक फायदेही होतात. म्हणूनच, कच्चा कांदा खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात. (eat-raw-onion-with-daily-meal-ssj93)

कच्चा कांदा खाण्याचे फायदे -

१. कांद्यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटामिन सी हे घटक असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

२. पचनक्रिया सुधारते.

३. श्वसनासंबंधीचे विकार दूर होतात.

४. शरीरातील ऊर्जा वाढविण्यास मदत मिळते.

५. कांदा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.

६.अपचन होत असल्यास कांदा खावा.

७. कच्चा कांदा खाल्ल्यामुळे सर्दी-खोकल्याचे विकार होत नाहीत.

८. चक्कर आल्यास कांद्याचा वास द्यावा. त्यामुळे व्यक्ती शुद्धीवर येण्यास मदत मिळते.

loading image