दररोज एक टोमॅटो खाल्यास आरोग्य आणि चेहऱ्यासाठी होतील हे फायदे

Eating a tomato every day will have health and facial benefits.jpg
Eating a tomato every day will have health and facial benefits.jpg

पुणे : रोजच्या आहारात आपण टोमॅटो वापरतोच. काहींना भाजीमध्ये टोमॅटो खायला आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु टोमॅटोचे औषधी गुणधर्म केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही चांगले कार्य करतात. टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी आणि चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. दररोज एक टोमॅटो खाल्ल्याने आणि चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला चमक येते. 

टोमॅटो पाहण्यासाठी जितके सुंदर आहे, तितकेच खाण्यासाठी ही अधिक मजेदार आहे. हे फळ आणि भाज्या दोन्हीमध्ये मोजले जाते, त्याचप्रमाणे हे आरोग्य आणि सौंदर्य देखील खुलवण्यास मदत करते. ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर ग्लो येतो आणि त्याचे अनेक कॉस्मेटिक फायदेही होतात, ज्याबद्दल काहीच लोकांना याबद्दल माहिती आहे. चला मग जाणून घेऊयात. आम्ही तुम्हाला टोमॅटो खाण्यासाठी आणि चेहऱ्यावर लावण्यासाठी होणारे फायदे सांगणार आहोत. 

टॅनिंग निघण्यास मदत 

टोमॅटो त्वचेवर सनस्क्रीन म्हणून कार्य करते. हे सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. दररोज चेहर्‍यावर लावल्यानंतर सनटॅन्टींग निघून जाते. टोमॅटो एक (सिट्रस) लिंबूवर्गीय फळ आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. हे सूर्य प्रकाशाने होणारा त्वचेला संरक्षण करण्यात खूप उपयुक्त आहे. 

टोमॅटो इतके प्रभावी आहे की जर तुम्ही त्वचेवर सतत वापरलात तर तुम्हाला महागड्या सनस्क्रीन क्रीमची आवश्यकताही भासणार नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. ज्यांची त्वचा कोरडी आहे अशानी चेहऱ्यावर मॉइश्चराइज जरूर करा. 

तेलकट त्वचेसाठी फायदेशीर 

टोमॅटो तेलकट त्वचेसाठी औषध म्हणून काम करते. वास्तविक, टोमॅटोचा आंबटपणा ही त्याची सर्वात चांगली गुणवत्ता आहे. त्याच वेळी त्याला लाल रंग देणारी लाइकोपीन त्वचेवर अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. त्वचा धूळ आणि मातीच्या नुकसानीपासून सुरक्षित ठेवते. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई असल्याने हे त्वचेपासून जास्त सीबमचे उत्पादन नियंत्रित करते.

टोमॅटोमुळे वाढत्या वृद्धत्वाचा परिणाम कमी करतो

वाढत्या सुरकुत्या रोखण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. त्यात आढळणारी लाइकोपीन कॅरोटीनोईड्ससारखे कार्य करते. हे त्वचेचे पेशी खराब होण्यापासून बचाव करते. यामुळे हळू हळू तुमचा चेहरा ग्लो करेल. परंतु चेहऱ्यावर टोमॅटो लावल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका, चेहऱ्यावर रिएक्शन होण्याची  शक्यता असते. 

ब्लॅकहेड्सची समस्या दूर करते

तुम्ही हे वापरलात तर तुमच्या त्वचेचे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या कमी करते. टोमॅटो चेहऱ्यावर एस्ट्रिंजेंट म्हणून काम करते, टोमॅटोमध्ये असणारे अम्लीय गुणधर्म नखे, मुरुम आणि काळ्या डागांची समस्या कमी करतात. तसेच तुमच्या त्वचेला चमकदार बनवते.

त्वचेवर टोमॅटो लावल्यास डेड स्किनवरील पेशी सहज काढता येतात. टोमॅटो डेड स्किन काढून टाकते, आणि त्वचा स्वच्छ ठेवते त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. 

सौंदर्य वाढवा

टोमॅटो कोशिंबिरीमध्येसुद्धा खात चला. जर पोट साफ असेल तर त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. टोमॅटोचे सेवन केल्याने डोळ्यांची चमक आणि सौंदर्यही वाढते. कारण त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांचा प्रकाश वाढविण्यात मदत करते आणि डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करते.

टोमॅटो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करते, जे त्वचेला नुकसान करण्याचे काम करते. अशा प्रकारे टोमॅटो त्वचा स्वच्छ ठेवण्यासही मदत करते. काही जणांचा असा विश्वास आहे की, जर टोमॅटो खाण्यापूर्वी त्याच्यावरील साल आणि बियाणे काढून टाकले तर ते अधिक प्रभावी ठरते. तथापि याबद्दल ठोसपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही.

त्वचेवर टोमॅटो या पद्धतीने लावा

- टोमॅटोचा रस काकडीच्या रसात मिसळा आणि लावा. आता ते 15 मिनिटांनंतर धुवा. ऑयली स्किनच्या समस्येपासून दूर ठेवते.  
- सनबर्न काढून टाकण्यासाठी टोमॅटोचा स्लाइस घ्या आणि तोंडावर चोळा. कमीतकमी 15 मिनिटांसाठी चेहर्‍यावर गोलाकार करून घासून घ्या, त्याचा वारंवार वापर केल्याने पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यास मदत करतील. 
- जर तुमची डेड स्किन असेल तर ते काढून टाकण्यासाठी साखर सह टोमॅटो चेहऱ्यावर लावा. यामुळे डेड स्किनची समस्या ठीक होईल,  तसेच तुमची त्वचा देखील चमकू लागेल.
- टोमॅटोची प्यूरी हरभरा पीठ आणि एक चिमूटभर हळद घालून मिक्स करून लावावे. परंतु यानंतर चेहरा मॉइश्चरायझर करणे विसरू नका
- उन्हाळ्यात त्वचा संतुलित करण्यासाठी टोमॅटो मसाज क्रीममध्ये मिक्स करून लावा. आपली त्वचा अधिक क्लीन होऊन चेहर्‍यावर चमक येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com