
- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
माझ्या योग वर्गातील माधवी (नाव बदलले आहे) अनेक वर्षांपासून मायग्रेन आणि अॅसिडिटीच्या समस्यांनी त्रस्त होती. अनियमित जीवनशैलीमुळे या समस्या वाढल्या होत्या. तिच्या समस्या समजून घेतल्यावर मी तिला योग्य योगासने, प्राणायाम, आणि आहारातील बदल सुचवले. तीन महिन्यांच्या सरावानंतर तिच्या समस्या लक्षणीयरीत्या कमी झाल्या, आणि सकारात्मक बदल घडून आले. आता आपण मायग्रेन आणि ॲसिडिटीवर नियंत्रणासाठी उपयुक्त योगासने आणि प्राणायाम बघू.