Electric Bike Care: उन्हाळ्यात ई-वाहने वापरताना पाळा सुरक्षेची पंचसूत्री

Electric Bike Care Tips In Summer: ई-बाईकच्या बॅटरीची नियमित देखभाल करणे गरजेचे असते.
Electric Bike Care
Electric Bike CareSakal

Electric Bike Care Tips In Summer

इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली नाही वाहनांच्या बॅटऱ्यांचा स्फोट, आगीसारख्या भयंकर घटना घडत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळेच आता परिवहन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

पोलिसांनी आरटीओला कळवल्यास इ- बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला किंवा नाही याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले असल्याने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची विशेषतः ई-बाईकची विक्री वाढली आहे. दुसरीकडे राज्यभरात ई- बाइकचा स्फोट होण्याच्याही घटना वाढल्या आहेत. त्यासाठी सुरक्षेची पंचसूत्री वापरण्याची गरज आहे.

राज्य शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण 2021 लागू केले आहे. यामध्ये ही ई-बाइक्स व अन्य ई-वाहनांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीपर्यंत शंभर टक्के सूट दिलेली आहे.

त्यामुळेच ई-बाइक्स घेण्याकडे कल वाढला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या अन्वये बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिलेली आहे. त्यानुसार 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेग मर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा ई-बाइक्सना नोंदणीपासून सूट दिलेली आहे. त्यामुळेच अशा कमी क्षमतेच्या ई-बाइक परिवहन विभागाच्या परस्पर बाहेर विक्री केल्या जातात. यातून ग्राहकांची फसवणूक होते.

Electric Bike Care
AC Gas Leak : एसीमधील गॅस खरंच संपलाय, की मेकॅनिक करतोय फसवणूक? असं तपासा स्वतःच

परस्पर बदल करून विक्री

ई-बाइकमध्ये परस्पर अनेक बदल करून विक्री केल्या जात आहेत. अनधिकृतपणे अधिक क्षमतेच्या बॅटरी टाकून वाहनांची विक्री केली जाते. 250 वॅटपेक्षा कमी क्षमतेच्या ई-बाइक्स वाहन विक्रेत्यांकडे जाऊन वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना परिवहन विभागाने यापूर्वीच दिलेल्या आहेत. मात्र, पुरेशा प्रमाणात तपासण्या होत नाहीत, त्यामुळे वाहनांमध्ये अनधिकृत बदल केलेला आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ई-वाहनांच्या बॅटरीचे प्रकार

सध्याच्या इ-वाहनांमध्ये लिथियम बॅटरीचा वापर होतो. या बॅटरीमध्ये ‘एलएफपी’ आणि ‘एनएमसी’ हे प्रकार असतात. या दोन्हीही लिथियम आयन बॅटरी आहेत. परंतु त्यातील घटक वेगवेगळे असतात. ‘एलएफपी’ म्हणजे लिथियम आयन फॉस्फेट, तर ‘एनएमसी’ म्हणजे निकल मँगनीज कोबाल्ट. ‘एनएमसी’च्या तुलनेत ‘एलएफपी’ला सुरक्षित मानले जाते. ‘बीएमएस’ अर्थात बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिममध्ये काही बिघाड झाल्यास ‘एनएमसी’ बॅटरीमध्ये तापमान नियंत्रित होत नाही. याउलट ‘एलएफपी’ बॅटरीमध्ये होते.

बॅटरीमधील आगीचे कारण

पूर्ण चार्ज झालेली बॅटरी वापरानंतर पूर्ण डिस्चार्ज होते, तेव्हा बॅटरीमधील लहान-लहान घटक (मॉलिक्युल्स) ठराविक प्लेट्समध्ये बदलतात. त्यादरम्यान घर्षण होऊन बॅटरीचे तापमान वाढत जाते. त्यातही बाहेरील वातावरणही उष्ण असल्यास हे तापमान उच्च पातळीवर जाते.

प्रत्येक वाहनात ‘बीएमएस’ असते. ही यंत्रणा बॅटरीमधून साठवून ठेवलेल्या विजेचे नियोजन तसेच तापमानाचे नियंत्रण करते. परंतु, या यंत्रणेत बिघाड झाल्यास तापमान वाढ अनियंत्रित होते आणि बॅटरी अधिक गरम होऊन पेट घेते. बॅटरी ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ चार्जींगला लावून ठेवली तर ती ओव्हरहिट होऊन स्फोटाच्या घटना घडू शकतात.

ई-वाहनाच्या आगीला विविध घटक कारणीभूत असतात. घटना कशामुळे घडली हे निश्चित समजण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी करवी लागेल, त्यानंतरच खरा प्रकार समोर येईल. वारंवार होणाऱ्या अशा घटनांची विशेष दखल घेवून परिवहन विभागाने राज्यभर कारवाया सुरू ठेवलेल्या आहेत.

विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

या पाच बाबी पाळा , अन् अपघात टाळा

1. इलेक्ट्रिक वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा वापर टाळावा. पाण्यामुळे बॅटरीमध्ये असलेले लिथियम आणि हायड्रोजन एकमेकांच्या संपर्कात येऊन ज्वलनशील गॅस तयार होतो. अशावेळी एखादी चादर किंवा माती आगीवर टाकून ती आटोक्यात आणावी.

2. ज्या दुचाकीत डिटॅचेबल म्हणजेच काढता येणारी बॅटरी असेल, त्या वाहनधारकाने बॅटरी प्लगमधून काढताना किंवा लावताना मुख्य बटन बंद ठेवावे. बॅटरीचे कनेक्टर वारंवार काढणे आणि पुन्हा लावल्यामुळे घर्षण होऊन ते सैल होतात. अशावेळी स्पार्क होण्याची शक्यता वाढते.

3. वाहनातून काढलेली बॅटरी घरात किंवा एखाद्या ठिकाणी ठेवताना तिच्यावर थेट सूर्यकिरणे पडतील, अशा ठिकाणी ठेऊ नये.

4. प्रवास करून आल्यानंतर लगेच बॅटरी चार्जिंगला लावणे टाळावे. प्रवासामुळे ही बॅटरी आधीच तापलेली असते. बॅटरी थंड झाल्यानंतर ती चार्जिंगला लावावी.

5. अतिवापराने बॅटरीवर फुगवटा आल्यास किंवा अन्य बदल झाल्यास, दुर्गंधी येत असल्यास बॅटरी तात्काळ बदलावी. फास्ट चार्जिंग हे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने सोयीचे असले तरी बॅटरीचे आयुर्मान करणारे कमी आहे. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत फास्ट चार्जरचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com