Agricultural TechnologySakal
लाइफस्टाइल
उद्यमशीलतेची ‘मशागत’
तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसाठी एखादं साधं, परवडणारं आणि बहुउद्देशीय यंत्र तयार करण्याचं आम्ही ठरवलं. याच विचारातून बॅटरीवर चालणारं ‘इलेक्ट्रिक बैल’ हे उपकरण तयार झालं.
सोनाली सोनावणे
शेतीबाबत काम करत असताना आम्ही नेहमीच पाहत होतो, की शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यातही बैल सांभाळणं दिवसेंदिवस अवघड होत आहे. एकीकडे त्याचा खर्च, तर दुसरीकडे शेतीसाठी लागणारी वेळ व मेहनत वाढत चालली होती. या समस्येवर काहीतरी करायला हवं, हीच कल्पना मनात रुजली. मी आणि माझे पती, तुकाराम सोनावणे, आम्ही दोघं अभियंते आहोत. तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसाठी एखादं साधं, परवडणारं आणि बहुउद्देशीय यंत्र तयार करण्याचं आम्ही ठरवलं. याच विचारातून बॅटरीवर चालणारं ‘इलेक्ट्रिक बैल’ हे उपकरण तयार झालं.