मन-निर्मळ : एक न संपलेला अध्याय

Emotional Closure: How to Move On from Unfinished Relationships : नातं संपल्यानंतरही मनात अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. समोरच्या व्यक्तीकडून स्पष्टीकरण मिळण्याची अपेक्षा मनाला अडकवते. अशा वेळी स्वतःला सावरण्यासाठी मानसिक स्वीकार महत्त्वाचा ठरतो.
Emotional Closure: How to Move On from Unfinished Relationships

Emotional Closure: How to Move On from Unfinished Relationships

esakal

Updated on: 

डॉ. सुवर्णा बोबडे , समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

‘‘आम्ही दोन वर्षं छान एकत्र होतो. अचानक काय झालं, हेच मला समजत नाही. त्याने माझ्याशी बोलणं, फोन करणं, माझ्या मेसेजेसना उत्तर देणं, सगळंच बंद केलं. खूप रडावंसं वाटतं. झोप, कामातलं लक्ष, सगळंच बिघडलंय. एकदा त्याच्याकडून नेमकं काय झालं हे कळलं की मला पुढे जाता येईल. मला आता तो नकोच आहे. पण मग मला ‘क्लोजर’ कसं मिळणार?...’’

समोर बसलेल्या ‘ती’चं बोलणं ऐकताना एक गोष्ट जाणवत होती. दोन वर्षांचं नातं संपलं होतं आणि ते तिला मान्यही होतं. पण तिच्या मनात मात्र ते अजूनही सुरू होतं. ती त्या व्यक्तीची वाट पाहात नव्हती, तर त्या नात्याच्या शेवटाचं उत्तर शोधत होती. बाहेर एक अध्याय संपला होता, पण मनात मात्र त्याची पानं सतत उलटली जात होती.

Loading content, please wait...