कायम दिशादर्शक

माझी आई माझ्या आयुष्यातील दिशादर्शक आणि माझ्या आंतरिक शक्तीचा स्रोत आहे. माझा स्वतःवरदेखील विश्वास नव्हता, त्यावेळी तिनं माझ्यावर विश्वास ठेवला.
actress ayushi khurana
actress ayushi khuranasakal
Updated on

- आयुषी खुराणा, अभिनेत्री

माझी आई माझ्या आयुष्यातील दिशादर्शक आणि माझ्या आंतरिक शक्तीचा स्रोत आहे. माझा स्वतःवरदेखील विश्वास नव्हता, त्यावेळी तिनं माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या आयुष्यात आणि करिअरमध्ये मी जी काही उंची गाठली आहे, ती केवळ तिची श्रद्धा आणि प्रेमामुळेच.

तिनं आपल्या शब्दांमधून आणि कृतींमधून मला ताकद दिली. दयाळू आणि विनम्र राहायला शिकवलं. मी आयुष्यात जे काही मिळवले आहे, ते तिचा त्याग, मूल्यं आणि रोजचे कष्ट यामुळेच. ती कायमच माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com