लैंगिक समस्‍यांवर घ्यावे वेळीच उपचार तज्‍ज्ञांचा सल्ला

Sex Life Problems
Sex Life Problemsesakal

नाशिक : कामजीवनावर मोकळा संवाद होणे आवश्यक आहे. लैंगिक समस्या भेडसावत असल्‍यास वेळीच वैद्यकीय उपचार घेणे आवश्‍यक असल्‍याचे मत तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नाशिक शाखेतर्फे झालेल्‍या सेक्‍सीकॉन 2022 राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन केले.

स्त्री-पुरुष संबंधांना दृढ करणाऱ्या, वैवाहिक जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या आणि तरीही पुरुषांची मक्तेदारी सांगणाऱ्या व स्त्रियांच्या समस्या दुर्लक्षित करणाऱ्या अशा कामशास्त्र (Kamshastra) आणि कामजीवन (Sex Life) या विषयावर ही पहिलीच परिषद होती. देशभरातील सुमारे तेराशे डॉक्‍टरांनी परिषदेत सहभाग नोंदविला. परिषदेत ३० तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्याख्यानमालांतून सखोल माहिती मिळवली.

Sex Life Problems
Relationship Advice: रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण होतोय?

वैद्यकीय व्यवसाय करताना स्त्री आणि पुरुष रुग्णांच्या लैगिंक आणि कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या ज्ञानाचा डॉक्टरांना उपयोग होईल, असा विश्‍वास परिषदेचे आयोजक डॉ. हेमंत सोनानिस यांनी व्यक्त केली. राज्य IMA चे नियोजित अध्यक्ष डॉ रवींद्र कुटे, राज्य IMA चे सचिव डॉ. मंगेश पाटे, राष्ट्रीय सीजीपी अधिष्ठाता डॉ. अविनाश भोंडवे उपस्‍थित होते.

Sex Life Problems
शेफालीच्या कुटुंबातच स्त्री-पुरूष भेदभाव, सांगितला धक्कादायक अनुभव

मेंदूविकार तज्‍ज्ञ (Neurologist) डॉ. चारुदत्त आपटे यांनीही मार्गदर्शन केले. IMA सचिव डॉ. कविता गाडेकर, खजिनदार डॉ विशाल पवार, उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ आणि डॉ. उमेश नागपूरकर यांनी परीश्रम घेतले. डॉ. नीलेश जेजुरकर, डॉ स्वाती वंजारी, डॉ मीनल रणदिवे, डॉ किरण शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम सांभाळले.

Sex Life Problems
ये हैं मोहब्बतें! Russia-Ukraine युद्धाच्या विघ्नात हॉस्पिटलमध्ये लग्न!

स्त्री पुरुषांचे लैंगिक जीवन (Sex Life), लैंगिक समस्या (Sexual Problem), समलैंगिकता (Homesexuality), व्यसने आणि लैंगिक समस्या, लैंगिक समस्यांवर विविध उपचार पद्धती, औषधे, सेक्स थेरपी (Sex Therapy) आदी विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

Sex Life Problems
आठवड्याभराने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com