Face Care Tips
Face Care Tips esakal

Face Care Tips : केळी चेहऱ्याला लावण्याचे आहेत जास्त फायदे, एकदा प्रयोग करून तर पहा

केळी आणि कडुनिंबाचा फेस पॅक चेहऱ्याला बनवतो उजळ

Face Care Tips :  केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळी खाल्याने पोट जास्तवेळ भरलेलं राहतं त्यामुळं वजन कमी होतं. तर केळी खाल्ल्याने बारीक असणाऱ्यांचे वजनही वाढतं. अनेक लोकांना रोजच्या आहारात केळी खाणे आवडते.

केळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण केळीचा वापर त्वचेच्या काळजीसाठीही उत्तम उपाय ठरू शकतो. केळीमध्‍ये काही नैसर्गिक गोष्टी मिसळून लावल्‍याने तुम्‍ही त्वचेच्‍या अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

पोटॅशियमने समृद्ध केळी हे व्हिटॅमिन आणि झिंकचा उत्‍तम स्रोत मानले जाते. त्यामुळे केळीचा फेस पॅक त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

चला तर मग जाणून घेऊया त्वचेसाठी केळीचा फेस पॅक बनवण्याची पद्धत आणि त्याचे काही फायदे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोइंग आणि सुंदर बनवू शकता.

Face Care Tips
Banana Combinations: केळ्यासोबत या गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा तुमच्या आरोग्यावर होतील वाईट परिणाम!

केळी आणि कडुनिंबाचा फेस पॅक

केळी आणि कडुनिंबाचा फेस पॅक बनवण्यासाठी मॅश केलेले अर्धे केळे घ्या. नंतर त्यात १ चमचा कडुलिंब पावडर किंवा पेस्ट घाला. तसेच 1 चमचे हळद मिसळा. सर्वकाही मिसळा आणि चेहरा आणि मानेवर लावा. आता 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग निघून जाण्यास सुरुवात होते.

Face Care Tips
Jalgaon Banana Crop : वरखेडेची केळी थेट सौदी अरेबियात! 200 क्विंटल शेतमाल रवाना

केळी, काकडी आणि पपई फेस मास्क

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी केळी, काकडी आणि पपई फेस मास्क लावणे हा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. हे करण्यासाठी अर्धे केळे मॅश करा. नंतर अर्धी काकडी आणि पपई समप्रमाणात घेऊन मॅश करा. सर्वकाही मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटे कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

केळी त्वचेला पोषण देण्याचे काम करते. त्यामुळे पपई लावल्याने त्वचेवर पिगमेंटेशनचा त्रास होत नाही. तसेच काकडी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्याची चमक सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. (Banana)

Face Care Tips
Beneficial Raw Banana: चांगल्या आरोग्यासाठी पिकलेली केळीच कशाला हवी, कच्चे केळ खाण्याचेही आहेत अनेक फायदे!

केळी आणि दही फेस मास्क

केळी आणि दह्याचा मास्क लावून तुम्ही त्वचेच्या सुरकुत्या आणि बारीक रेषांपासून मुक्त होऊ शकता. हे करण्यासाठी अर्धी केळी मॅश करा. नंतर त्यात २ चमचे दही घालून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. काही वेळ सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेचे फ्री रॅडिकल्स आणि ओपन स्किन पोर्स कमी होऊ लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com