जादू प्रमाणे काम करते पाच प्रकारचे Clays तुम्हीपण जरूर अनुभवा!

जादू प्रमाणे काम करते पाच प्रकारचे  Clays तुम्हीपण जरूर अनुभवा!

कोल्हापूर: मुलतानी माती आपल्या चेहऱ्यावर कसे उजळपणा आणतो हे आपल्याला माहीतच आहे. परंतु अन्य अश्या काही माती (क्ले)(Clay)आहेत. जे आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि तेलकटपणा काढून टाकण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. नितळ चेहरा आणि स्वस्थ त्वचा होण्यासाठी आपण अनेक उपायोजना अवलंबतो. अनेक वेळा आपण अत्यंत महागड्या ब्यूटी प्रोडक्टचा वापर करतो. अनेक पद्धती चे घरगुती उपाय आपण वापरतो. परंतु खूपच कमी वेळा आपल्या मनात असा विचार येतो की आपण काही मातीचा चेहऱ्यासाठी वापर करावा. ज्यामुळे आपला चेहरा एकदम उजळ दिसेल. तुम्हाला क्ले आणि त्याचे गुणधर्म माहीत आहेत का? या क्ले चा वापर गेली अनेक दशके त्वचा चांगले ठेवण्यासाठी केला जातो. हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न (Calcium, Magnesium, Iron)आणि अनेक आवश्यक खनिज यामध्ये असतात. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मातीचे गुणधर्म जाणून घेणार आहोत जे आपल्या त्वचेला एक वेगळी उजळपणा देतात.

(face-clays-five-types-lifestyle-marathi-news)

Kaolin क्ले:

ही पावडर अनेक रंगांमध्ये उपलब्ध होते. त्यामध्ये गुलाबी, लाल, पांढरा, पिवळा अशा रंगाचा समावेश आहे. पांढरा क्ले सर्वसाधारणपणे सगळीकडेच उपलब्ध होतो. जे आपल्या संवेदनशील त्वचेसाठी चांगले असते. तर लाल रंगाची क्ले चेहर्‍यावरील धूर शोषून घेते. धूळ आणि चेहऱ्यावरील अनावश्यक घटक हटवण्यासाठी रेड क्ले हा एक चांगला पर्याय .पिवळा क्ले हे रेड आणि व्हाईट चे मिश्रण असते. तर हे रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी तसेच त्वचा एक्सफोलीयेंट होण्यासाठी मदत करते. हा घटक अनेक साबणांमध्ये सुद्धा वापरला जातो. अधिक संवेदनशील आणि कोरड्या त्वचेसाठी या फॉर्मुला चा वापर केला जातो.

ग्रीन जीयोलाइट क्ले:

जीयोलाइट मध्ये अनेक सूक्ष्मजीव मिनरल्स आहेत. जे त्वचेवरील रेषा कमी करण्यासाठी मदत करते. यामध्ये अल्कलाइन ग्राउंड वॉटर चे अवशेष असतात. त्यामुळे त्वचेवरील अनावश्यक घटक शोषणासाठी त्याची मदत होते. या क्लेच्या मोठ्या पार्टिकल्स मुळे हे एक्सफुलएंट प्रमाणेही काम करते यामध्ये अँटी अक्सिडेंट आणि एंटी-इंफ्लामेटरी गुण सुद्धा असतात. जे आपल्या चेहऱ्यावरील छिद्र चांगल्या पद्धतीने स्वच्छ करतात. आपल्या त्वचेला आवश्यक मिनरल्सची गरज असते. ते या माध्यमातून मिळत असतात. सर्वसाधारण त्वचेबरोबरच तेलकट त्वचेलाही याचा चांगला उपयोग होतो.

बेंटोनाइट क्ले:

चेहऱ्यावरील मळ आणि अतिरिक्त तेल घालवण्यासाठी बेंटोनाइट क्ले अत्यंत फायदेशीर ठरते. बेंटोनाइट क्लेमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशिअम, तसेच आयर्न सारखे नैसर्गिक खनिजे असतात. जे त्वचेला अधिक ज्यादा फायदेशीर ठरतात.बेंटोनाइट क्ले मध्ये कोरडेपणा अधिक असतो. जे एक्ने ब्रेकआउट आणि तेलकट त्वचेच्या उपचारासाठी अधिक मदत करते. त्वचेमधील अशुद्ध घटक बाहेर काढण्यासाठी या क्ले चा चांगला उपयोग होतो. सर्वसाधारण तसेच तेलकट त्वचेच्या उपचारासाठी बेंटोनाइट क्ले अधिक फायदेशीर ठरते.

मुल्तानी मिट्टी या फुलर अर्थ क्ले

त्वचेवरील तेलकटपणा शोषून घेण्यासाठी मुलतानी माती एक अत्यंत चांगला पर्याय आहे. ही माती गुलाब पाण्याबरोबर मिक्स करून लावल्यानंतर चेहऱ्यावरील तेलकटपणा तसेच चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ करण्यासाठी मदत होते. हाय पिगमेंटेशन साठी सुद्धा याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील पिंपल्स तसेच एक्ने बरोबर लढत असते. एवढेच नव्हे तर मुलतानी माती चेहऱ्याला अधिक थंडावा देते आणि टॅनिंग पासून आपली मुक्तता होते. स्कीन रेषा किंवा घामोळ्यावर सुद्धा ही माती अत्यंत उपयोगी ठरते. हे एक्ने प्रोन स्किन साठी ही अत्यंत प्रभावी आहे.

Rhassoul क्ले:

याचा वापर प्राचीन काळामध्ये सुद्धा केला जात होता. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे असतात. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग,ब्लैकहेड्स तसेच अन्य अशुद्धीला त्वचे वरील बाजूस करण्यास मदत होते. त्वचेचा इलास्टिसिटी यामुळे चांगला होतो. हे एक्टीवेटेड चारकोल प्रमाणे काम करते. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघण्यासाठी चांगली मदत होते आणि त्वचा अधिक कोमल आणि मुलायम बनते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com