
मेटाने आपल्या फेसबुक यूजर्सना एक मोठी भेट दिली आहे. तुम्ही आता एकाच फेसबुक अकाउंटवर पाच प्रोफाईल तयार करू शकाल. या नवीन वैशिष्ट्यांचा कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांची इंगेजमेंट वाढवणे हा आहे. या नवीन फीचरची सध्या टेस्टिंग सुरू आहे. अहवालानुसार, टेस्टिंगमध्ये सहभागी असलेल्या बीटा वापरकर्त्यांना एकाच खात्यातून पाच प्रोफाइल तयार करण्याची सुविधा मिळत आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला अतिरिक्त प्रोफाइलमध्ये तुमचे खरे नाव नमूद करण्याचीही गरज नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही तुमची ओळख लपवून एखाद्या पोस्टवर कमेंट करू शकाल. पण, यामुळे इतरही धोके वाढण्याची शक्यता आहे.
Meta ने म्हटले आहे की, अतिरिक्त प्रोफाइलने देखील Facebook च्या धोरणाचे पालन केले पाहिजे. याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमच्या इतर प्रोफाइलसह पॉलिसीचे उल्लंघन केले तर तुमचे मुख्य खाते देखील प्रभावित होईल.
या नवीन फीचरबाबत, फेसबुकचा विश्वास आहे की यामुळे वापरकर्त्यांना वेगळ्या ओळखीसह एक स्वतंत्र फीड मिळेल. म्हणजे जर एखाद्या वापरकर्त्याला गेम आणि प्रवास या दोन्हीमध्ये स्वारस्य असेल तर तो या दोन्ही गोष्टीनुसार त्याची प्रोफाइल तयार करू शकेल आणि लोकांना फॉलो करू शकेल. आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय की, मेटा ने मेटाव्हरर्स आणि वेब 3 साठी आपले वॉलेट लाँच केले आहे, जे एक सार्वत्रिक पेमेंट मोड आहे.
Meta च्या या पेमेंट सिस्टमचे नाव Meta Pay आहे. ज्याद्वारे Metaverse व्यतिरिक्त, सामान्य पेमेंट देखील केले जाऊ शकते. Meta Pay हा फेसबुक पेचा नवीन अवतार आहे.
Meta Pay बद्दल, Meta चे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, वेब 3 च्या जगात मालकीवरून मोठा संघर्ष सुरू आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा आहे. आगामी काळात युजर्स डिजिटल कपडे घालतील. आगामी काळात, मेटाव्हर्समध्ये देखील खरेदी होईल ज्यासाठी पेमेंट सिस्टमची आवश्यकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.