

Understanding the Gap Between Reality and Perception
Sakal
डॉ. सुवर्णा बोबडे (समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ)
मन-निर्मळ
‘तो असा बोलला म्हणजे त्याला माझी कदर नाही...’, ‘तिने मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष केलं...’, ‘माझं काम आवडलं असतं तर ते काहीतरी बोलले असते...’
आपल्या अवतीभवती अशा घटना घडत असतात आणि त्या अनुषंगाने अशा आपल्या-आपल्याशीच चालत असलेल्या संवादांनी आपलं मन दिवसभर भरलेलं असतं! घटना वेगळ्या, अनुभवणारी माणसंही वेगळी... पण या सगळ्या स्व-संवादात एक गोष्ट समान असते, ती म्हणजे- हा संवाद म्हणजे वस्तुस्थिती नसते, तर वस्तुस्थितीविषयी आपण करून घेतलेला आपला समज असतो.