हायलाइटरचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या ब्युटी टिप्स

सध्याच्या काळात स्मार्ट असण्यासोबतच प्रेझेंटेबल असणंही तितकंच गरजेचं आहे.
हायलाइटरचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या ब्युटी टिप्स

सध्याच्या काळात स्मार्ट असण्यासोबतच प्रेझेंटेबल असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे पार्टी असो वा ऑफिसमधील एखादी मिटींग परफेक्ट गेटअप आणि निटनेटकेपणे स्वत:ला सादर करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच अनेक मुली दैनंदिन जीवनातदेखील हलकासा मेकअप करत असतात. आता खरंतर मेकअप म्हटलं की डोळ्यासमोर असंख्य सौदर्यप्रसाधने येतात. अगदी काजळापासून ते लिप्स्टिकपर्यंत. मात्र, या सगळ्यात हायलाइटरचा (highlighter) सर्वात जास्त वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणूनच हायलाइटर वापरण्यापूर्वी तो नेमका कसा वापरावा किंवा त्यामुळे काय होतं ते जाणून घेऊयात. (fashion beauty what is the work of highlighter)

मेकअप करतांना हायलाइटरचा (highlighter) वापर नाक, गाल, ओठ आणि गालांवर केला जातो. या हायलाइटरमुळे चेहऱ्यावर चकाकी येते. त्यामुळे चला पाहुयात हायलाइटरचा वापर कसा करावा.

१. ब्लशच्या वापरापूर्वी -

ब्लश करण्यापूर्वी हायलाइटरचा वापर केल्यास चेहऱ्यावरील ग्लो वाढतो. त्यामुळे चेहऱ्यावर चकाकी येते.

हायलाइटरचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या ब्युटी टिप्स
'अभ्यास करुन डोकं खराब झालंय'; चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

२. ओठांवर लावा हायलाइटर -

हायलाइटरचा वापर ओठांवरदेखील केला जातो. प्रथम ओठांवर किंचितसं हायलाइटर लावा. त्यानंतर लिप्स्टिक किंवा लिपग्लॉस लावा. त्यामुळे लिप्स्टिक दिर्घकाळापर्यंत टिकून राहते.

३.हायलाइटरने द्या डोळ्यांना शिमरी लूक -

डोळे उठावदार दिसण्यासाठी अनेक मुली आयशॅडो, काजळ, लायनर यांचा वापर करत असतात. यामध्येच हायलाइटरचा वापरदेखील आयशॅडो सारखा करता येतो. जर डोळ्यांवर हायलाइटर लावलं तर त्यामुळे डोळ्यांना शिमरी लूक येतो.

४. हायलाइटरचा वापर कसा करावा?

प्रथम कंसिलर घेऊन त्यात थोडंसं हायलाइटर मिक्स करा व स्पॉन्जच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. त्यानंतर फाऊंडेशन आणि सेटिंग पावडर मिक्स करुन लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com