Fashion:प्रत्येक हंगामात स्वतःला आकर्षक ठेवण्यासाठी चार महत्वाच्या गोष्टी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 5 March 2021

कोरोनामुळे मागील वर्ष आपलं सर्वांचं घरातच गेलं. कोणतेही कार्यक्रम झाले नव्हते. बऱ़्याच जणांनी वर्क फ्रॉम होम काम केल्याचं दिसलं होतं

औरंगाबाद: कोरोनामुळे मागील वर्ष आपलं सर्वांचं घरातच गेलं. कोणतेही कार्यक्रम झाले नव्हते. बऱ़्याच जणांनी वर्क फ्रॉम होम काम केल्याचं दिसलं होतं. पण गेल्या दोन-तीन महिन्यापासून कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने बरेच जण विविध कार्यक्रमाला तसेच कामावर जात आहेत. कोरोनामुळे सर्वांची जीवनपध्दतच बदलली होती. आता बरेच कार्यक्रम वगैरे होत आहेत. या लेखात स्टाईलसंबंधी काय करता येईल जाणून घेऊया

पांढरा शर्ट-
पांढऱ्या रंगाची बटणं असणारा एकदम सफेद पांढरा शर्ट तुम्हाला उत्तम पर्याय असेल. हा पर्याय तुम्हाला कॅज्युअल लुक देण्यास खूप मदत करेल.

जेव्हा तुमचे मूल आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगताेय; जाणून घ्या काय करावे

लिटिल ब्लॅक ड्रेस-
हा फॅशनचा प्रकार एलबीडी नावानेही ओळखला जातो. हा एक क्लासिक अनुभव देऊन जातो. फार्मल मिटींग्स दरम्यान तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरीसोबत घालू शकता. 

स्निकर्स-
तुमच्या रॅकमध्ये महत्त्वाचे म्हणजे पांढरे स्नीकर असलेत पाहिजेत. याचा उपयोग डेनिम, ड्रेस आणि शॉर्ट्ससह घाला. स्नीकर्स हे बरेच आरामदायक असतात.

मन मोहून घेणाऱ्या सुंदर फुलांचे औषधी गुणधर्मही विशेष! जाणून घ्या

रिस्ट वॉच-
हातातील घड्याळ आपल्या फॅशनमधल्या मुलूभुत वस्तूपैंकी एक आहे. हातातील घड्याळ नेहमीच आपलं सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतं. त्यामूळे हातात एक घड्याळ असणं गरजेचं आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fashion Four important things to keep yourself attractive every season