शिफॉन साडी वर्षानुवर्ष नवी कोरी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टीप्स

शिफॉन साडीला स्त्रियांची कायमच पहिली पसंती असते
शिफॉन साडी वर्षानुवर्ष नवी कोरी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' टीप्स
Updated on

असं म्हटलं जातं साडी हे स्त्रीचं पहिलं प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात स्त्रिया साडी नेसून आल्या की त्यांच्या सौंदर्यात जणू चार चाँद लागतात. विशेष म्हणजे स्त्रियांची ही आवड लक्षात घेता बाजारातही विविध डिझाइनच्या आणि प्रकारच्या साडी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच शिफॉन साडीला स्त्रियांची कायमच पहिली पसंती असते. फॅशन जगतातील ट्रेंड कितीही बदलले तरीदेखील शिफॉनची साडी त्या प्रत्येक ट्रेंडमध्ये कायमच वर असते. अगदी बॉलिवूड अभिनेत्रीदेखील या साडीला कायमच पसंती देत असतात. म्हणूनच, शिफॉनची साडी वर्षानुवर्ष चांगली रहावी यासाठी काही टिप्स आज आम्ही देणार आहोत. (fashion how to maintain chiffon sarees)

१. वॉशिंग मशीनमध्ये धुवून नका -

शिफॉन साडीला कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकू नये. ही साडी कायमच हाताने धुवून टाकावी. त्यातही ब्रश लावून साडी धुवू नये. डिटर्जंट पावडर पाण्यात मिक्स करुन त्या पाण्यात साडी भिजवून ठेवावी. २०-२५ मिनीटांनी हलक्या हाताने साडी धुवावी. तसंच ही साडी कायम वेगळ्या स्वतंत्र बादलीत भिजवून ठेवावी. इतर कपड्यांमध्ये ठेवल्यास एखाद्या कपड्याचा डाग त्यावर लागू शकतो.

२. उन्हात वाळवू नका -

कपडे व्यवस्थित वाळले जावेत यासाठी आपण कायमच कडक उन्हात ते वाळवत असतो. परंतु, शिफॉनची साडी कधीच कडक उन्हात वाळवू नका. त्यामुळे तिचा रंग फिकट होण्याची व साडीवर रिंकल्स पडण्याची शक्यता असते.

३. इस्त्री करताना काळजी घ्या -

शिफॉन साडीवर कधीही थेट इस्त्री फिरवू नका. इस्त्री करण्यापूर्वी त्यावर पेपर किंवा सुती कापड टाका व त्यावर प्रेस करण्यास सुरुवात करा.

४. न्यूज पेपरमध्ये गुंडाळून ठेवा -

शिफॉनच्या साडीला इस्त्री करुन झाल्यानंतर तिला न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवावी. बऱ्याच वेळा कपाटातून कपडे काढत असताना साड्यांची घडी विस्कटली जाते. त्यामुळे पेपरमध्ये साडी फोल्ड केली तर तिची घडी पटकन विस्कटत नाही. तसंच इस्त्रीवाले ज्या पद्धतीने साडी पेपरमध्ये गुंडाळून देतात. त्याच पद्धतीने पेपर गुंडाळल्यावर त्यावरुन दोऱ्याने पेपर नीट सेट करावा.

५. घडी जास्त काळ ठेऊ नये -

पेपरमध्ये साडी गुंडाळून ठेवल्यानंतर अनेक स्त्रिया वर्षानुवर्षच साडी तशीच ठेवतात. परंतु, साडीची घडी २-३ आठवड्यातून बदलावी. अनेकदा वर्षभर किंवा ६ महिने एकाच घडी साडी राहिली तर ठराविक ठिकाणी साडीवर घड्या पडतात. ज्यामुळे साडीवरील विशिष्ट भाग हा फिकट किंवा विरल्यासारखा दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com