
Fathers Day: आपल्या आईवडिलांना द्या असंही अनोखं 'गिफ्ट'
Fathers Day 2022: ऊद्या जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने आपल्यापैकी सर्वजण आपल्या वडिलांना काहीतरी गिफ्ट देण्याचा विचार करत असाल. असंच एक अनोखं गिफ्ट तुम्ही तुमच्या आईवडिलांना देऊ शकता. व्हाट्सअपने वापरण्यासंदर्भातील नवीन टीप्स जारी केल्या आहेत त्या टिप्स सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आपल्या आईवडिलांना देऊ शकता.
(Fathers Day Special Gift)
फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईवडिलांना व्हाट्सअप वापरण्यासंदर्भात खालील टिप्स सांगू शकता.
एखादा मेसेज फॉरवर्ड करण्याअगोदर दोनदा विचार करा
एखादा मेसेज शेअर करण्यापूर्वी व्हाट्सअपने त्यावर काही मर्यादा घालल्या आहेत. मेसेज शेअर करण्यापूर्वी वापरकर्त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे.
माहिती तपासणी
भारतात व्हाट्सअपसाठी वेगवेगळ्या १० माहिती तपासणी संस्था आहेत. त्याद्वारे एखाद्या वापरकर्त्यांची ओळख तपासणीसाठी आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरूपयोग न होण्यासाठी मदत होते.
Two Step Verification चालू करा
व्हाट्सअपने सध्या आपल्या वापरकर्त्यांसाठी माहितीचा दुरूपयोग न होण्यासाठी अनेक टुल्स आणले आहेत ज्यामध्ये Two Step Verification आपले व्हाट्सअप अधिक सुरक्षित करू शकतो. ज्यासाठी तुमचे WhatsApp खाते रीसेट करताना पिन आवश्यक असतो. तुमच्या वडिलांचे सिमकार्ड चोरीला गेल्यास किंवा त्यांच्या फोनमध्ये बिघाड झाल्यास हे उपयुक्त ठरेल.
अनावश्यक संपर्क ब्लॉक करा
आपल्या कॉल लिस्ट मधील अनावश्यक संपर्क क्रमांक ब्लॉक करण्याचा सल्ला तुम्ही तुमच्या पालकांना देऊ शकता. याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप आता रिपोर्ट केलेले संदेश ठेवण्याचा पर्याय देणार असल्याची माहिती आहे.
आपले मेसेज खासगी ठेवा
व्हाट्सअप मधील नवीन फिचर्समध्ये 'डिसपिअरिंग मेसेजेस' सारख्या वैशिष्ट्यांमुळे एखाद्या ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज आपण निवडलेल्या कालावधी नंतर लोकांसांठी अदृश्य होऊ शकतो. तसेच WhatsApp वर, वापरकर्त्यांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की, प्रोफाईल फोटो, लास्ट सीन, बद्दल, स्टेटस हे कोण पाहणार किंवा कोणाला दाखवायचे नाही हे आता ठरवता येणार आहे.
काय शेअर करावे यावर नियंत्रण ठेवा
पत्ता, फोन नंबर, पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर आणि बँक खाते माहिती यासारखी संवेदनशील माहिती शेअर करणे टाळा.
मेसेजवर क्लिक करताना सावधगिरी बाळगा
आपल्या व्हाट्सअपवर एखादे स्पॅम मेसेज येऊ शकतात. ते सावधगिरी बाळगत उघडले पाहिजेत कारण त्यामुळे आपल्या वैयक्तिक माहिती चोरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या मेसेदवर शंका असेल तर तुम्ही वापरतर्त्याला ब्लॉक करू शकता.
यावर्षीच्या फादर्स डे निमित्त तुम्ही आपल्या पालकांना ही माहिती समजावून सांगू शकता. आपल माहिती गोपनीय ठेवण्यासाठी हेच मोठं गिफ्ट असणार आहे.
Web Title: Fathers Day 2022 Whatsapp New Tips For Parents For Gift
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..