सण जवळ आले, की हल्ली गलबलायलाच होतं. सगळीकडे त्या सणांची जोरदार तयारी सुरू असते. सगळे बाजार फुलांनी, सजावटींच्या गोष्टींनी अगदी गच्च भरलेले असतात. चक्क दुकानंही नव्या कपड्यांनी ‘सजलेली’ असतात. मी दर सणाला माझ्या कर्जतच्या घरी जाते. त्या दिवाळीलाही मी अशीच कर्जतला निघाले होते.