Diwali 2024 : दिवाळी सणाचे महत्त्व काय?

Diwali 2024 Festival Importance: दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी दिव्यांचा सण साजरा केला जातो.
Diwali 2024
Diwali 2024 Sakal
Updated on

- गुरूदेव श्री श्री रविशंकर

Diwali 2024 Festival Importance: दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी दिव्यांचा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लोक त्यांनी कमावलेली सर्व संपत्ती त्यांच्यासमोर ठेवतात आणि समृद्धी व कृतज्ञतेचा अनुभव घेतात. जेव्हा तुम्ही जीवनातील टंचाईवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा टंचाई वाढते, परंतु जेव्हा तुम्ही समृद्धीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा समृद्धी वाढते. दिवाळीचा सण आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाची आठवण करून देतो. या दिवशी केवळ घर सजविण्यासाठी दिवा लावू नका, तर प्रत्येकाच्या हृदयात ज्ञान आणि प्रेमाचा दिवा लावा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com