
ऋतुजा बागवे / नम्रता संभेराव
मैत्री म्हणजे केवळ सहवास नव्हे, तर एकमेकांच्या भावनांचा आदर, सुख-दुःखात साथ देण्याची वृत्ती आणि नात्यातील पारदर्शकता. अनेकदा या नात्याला विशिष्ट वय, वेळ किंवा परिस्थितीची गरज नसते. ऋतुजा बागवे आणि नम्रता संभेराव यांची मैत्री याचेच उदाहरण आहे. त्यांच्या स्नेहबंधाचा प्रवास त्यांच्या कॉलेजपासून सुरू झाला; पण आजही तो तितक्याच घट्टपणे टिकून आहे.