

डॉ. समीरा गुजर-जोशी
मी आणि माझी मैत्रीण बोलत होतो. संध्याकाळ चार- साडेचारचा सुमार. एका बाजूला तिचं चहा करणं सुरू होतं. इतक्यात तिच्या फोनवर मेसेज नोटिफिकेशन आलं. तिनं फोनकडे पाहिलं आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी सहज विचारलं, ‘‘काय ग? कुणाचा मेसेज.’’ ती हसत म्हणाली, ‘‘मुलाचा. अमेरिकेत असतो ना मोठा, त्याचा.’’ मी म्हटलं, ‘‘अरे व्वा! काय म्हणतोय?’’ ती म्हणाली, ‘‘गुड मॉर्निंग.’’ आता मला फार आश्चर्य वाटलं. नाही, भारतात संध्याकाळ असली तरी त्याचा दिवस सुरू आता झाला असेल याचा अंदाज मलाही आला; पण नुसतं ‘गुड मॉर्निंग’ म्हणायला मेसेज.