
अश्विनी आपटे- खुर्जेकर - व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
‘फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन’ म्हणजेच पहिली भेट कायमची छाप पाडते. फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे पहिली छाप. एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा झालेल्या संपर्कातून निर्माण होणारी आपली प्रतिमा. मजेदार तथ्य सांगायचं झालं, तर अनेक तज्ज्ञांनी आणि त्यांच्या संशोधनातन हे सिद्ध झालंय, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यावरती सात सेकंदाच्या आत तुमच्या मनात त्या व्यक्तीची पहिली प्रतिमा निर्माण झालेली असते. पहिली प्रतिमा काही सेकंदात निर्माण होत असल्यामुळे ती तुमचे कपडे, तुमचे हावभाव, तुमची देहबोली, तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तुमची संवादशैली या गोष्टींवर ती अवलंबून असते.