
उन्हाळ्यात चेहरा टॅन होतो? हे पाच घरगुती उपाय नक्की ट्राय करा
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्वचेवर थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट वापरतो मात्र अनेकदा त्याचा काहाही फायदा होत नाही.यासाठी तुम्ही सोपी आणि घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. अगदी घरघुती फेसपॅकमुळे आपली त्वचा तजेलदार दिसू शकते. (five easy homemade face pack for fresh and glowing fair skin)
खालील प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरघुती फेसपॅक तयार करु शकता.
१. कोरफड
कोरफड हे त्वचेसाठी खुप उत्तम आणि खूप जास्त फायदेशीर मानली जाते. यामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करतात.त्यामुळे कोरफडीचा आतला भाग तुम्ही फेसपॅक म्हणून वापरला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होइल.
२. दही आणि ताजी मलई
दही आणि ताजी मलई त्वचा ताजे तवानी ठेवण्यास मदत करते. या शिवाय दही लावल्याने थकवा दूर होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही सुधारतो. एका भांड्यात तीन ते चार चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा ताजी मलई घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
३. कॉफी आणि मध
कॉफी ही गरम असते मात्र मध्ये कॉफी मध्ये असलेले घटक त्वचा सुधारण्यास मदत करतात कोरडी आणि थकलेली त्वचा टवटवीत करण्यासाठी कॉफीमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
४. केळी आणि मध
केळी आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते.यामुळे त्वचा चमकदार बनते. एक वाटीत एक केळी मॅश करा आणि त्यात एक छोटा चमचा मध घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा राहू द्या.त्यानंतर थोड्या वेळाने चेहरा धुवा.
५. लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल पॅक
लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल हे तिन्ही त्वचेसाठी खुप पोषक असतात. लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल यांचा एकत्र फेसपॅक त्वचेसाठी उत्तम असतो. यासाठी एक मोठा चमचा लिंबाचा रस, एकमोठा चमचा काकडीचा रस,एक मोठा चमचा गुलाब जल घ्या. चांगल्या प्रकारे एकत्र मिसळा आणि टॅनिंग झालेल्या ठिकाणी त्वचेवर लावा. १२ मिनीटं हा पॅक लावून ठेवावा नंतर धुवून टाका. असं दररोज करा.
Web Title: Five Easy Homemade Face Pack For Fresh And Glowing Fair Skin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..