Picnic Spots near Pune: रोजच्या कामातून विसावा हवाय, तर पुण्यातील 'या' 5 ठिकाणी जाऊ शकता सहलीला

Picnic Spots near Pune: पुणे जिह्यात अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमची एक दिवसाची सहल करू शकता.
Pune Travel
Pune TravelSakal

Picnic Spots near Pune: पुण्याला विद्येचे माहेरघर तर म्हटले जातेच, पण त्याचबरोबर पुणे हे सांस्कृतिक शहरांपैकी एक देखील आहे. पण पुणे जिह्यात अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही तुमची एक दिवसाची सहल करू शकता.

काही ठिकाणे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात नेतील, तर काही ठिकाणांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. काही शहरे मुख्य शहरापासून थोडी दूर असून तुम्हाला ताजेतवाने करण्यात मदत करू शकतात. त्यामुळे पुण्यात फिरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातीलच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊ.

1. शनिवार वाडा, पाताळेश्वर मंदिर

पेशव्यांचा इतिहास सांगणारे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे शनिवार वाडा. पुण्यातील शनिवार पेठेत असणारा शनिवार वाडा सकाळी ९ ते संध्याकाळी ६.३० पर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. ५ रुपये शनिवारवाड्याची प्रवेश फी आहे.

याशिवाय पाताळेश्वर लेणी मंदिर हे शिवाजीनगर भागात जंगली महाराज रस्त्यावर आहे. अखंड पाषाणात खोदलेली ही लेणी असून मोठे खांब यामध्ये आढळतात. तसेच या लेणीमध्ये महादेवाची पिंड आहे. तसेच लेणीशेजारीत जंगली महाराज मंदिरही आहे. त्यामुळे साधारण एका दिवसात या गोष्टी पुण्यात फिरून होऊ शकतात.

2. लोणावळा-खंडाळा

पुण्यातील लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेत.लोणावळा आणि खंडाळा ही ठिकाणे पावसाळ्यात फिरण्यासाठी अधिक योग्य आहेत. या ठिकाणी अनेक सुदंर धबधबे पाहायला मिळतात.

तसेच सनसेट, सनराईज पाँइंट्स या ठिकाणी आहेत. तसेच निसर्गाच्या जवळ नेणारे हे ठिकाण असून येथे डोंगर-दऱ्यांमध्ये फिरण्याचाही आनंद घेऊ शकता.

Pune Travel
Female-Friendly Travel : महिलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि आरामदायक; 'या' अ‍ॅपने लाँच केलं खास फीचर

3. पवना धरण

लोणावळ्यापासून जवळ असणारे पवना धरणही फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे रात्री कॅम्पिंगही करता येते. बऱ्याचदा पर्यटक कॅम्पिंगसाठी पवना भेट देतात.

4. गड-किल्ले

पुणे जिह्यात अनेक गड-किल्ले आहेत. त्यामुळे ट्रेकिंग आवडणाऱ्यांसाठी सिंहगड, तोरणा, तिकोणा, तुंग, विसापूर, राजमाची, लोहगड असे अनेक गड-किल्ले फिरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

5. पाणशेत

निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले पाणशेत ठिकाणही सहलीसाठी एक उत्तम पर्याय आहे. पाणशेतमध्ये धरणही आहे. त्यामुळे रोजच्या धकधकीच्या आयुष्यातून विसावा घेण्यासाठी हे ठिकाण एक चांगला पर्याय ठरते. येथे काही होमस्टे देखील आहेत.

Pune Travel
Goa Travel : गोव्यातील 'या' बेटासमोर बालीचे सौंदर्य पडेल फिके, एकदा भेट द्याल तर पुन्हा जाल!

6. कामशेत

पुण्यापासून जवळ असणारे हे छोटेसे गाव असून ते पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. तिथे त्यासाठी ट्रेनिंगही दिले जाते. शिंदे वाडी टेकडी ही यासाठी लोकप्रिय टेक-ऑफ पाँइंट आहे.

7. कार्ला लेणी

लोणावळ्याजवळ असणारी कार्ला लेणी कोरीव कामामुळे ओळखली जाते. भारतातील मोठ्या आणि प्रसिद्ध चैत्यगृहांपैकी एक येथे आहे. ही बौद्ध लेणी आहे. या लेणीजवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. लेणी पाहाण्यासाठी प्रवेश शुक्ल आकारण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com