सध्याच्या काळात भावनिकदृष्ट्या सक्षम कसे व्हाल? Tips To Become Emotionally Strong | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सध्याच्या काळात भावनिकदृष्ट्या सक्षम कसे व्हाल?

भावनिकदृष्ट्या सक्षम, बळकट असणं हेसुद्धा एक कौशल्य आहे. अनेकदा भावनेच्या आहारी जाऊन आपण चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण आपल्या भावनांवर स्वत:चं नियंत्रण असल्यास समोरची कोणतीही व्यक्ती तुम्हाला दुखावू शकत नाही किंवा तुम्ही त्या व्यक्तीसमोर, परिस्थितीसमोर खचू शकत नाही. सध्याच्या घडीला, भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम राहणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी पुढील पाच टिप्स तुमची मदत करू शकतील..

सध्याच्या काळात भावनिकदृष्ट्या सक्षम कसे व्हाल?

१- नवीन उद्दिष्ट ठरवा -राग, ताण-तणाव, चिंता, द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांना सामोरं जाण्याचे आपल्या सर्वांचे वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र हे मार्ग त्यावरील अल्पकालीन उपाय आहेत. भावनिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी दीर्घकालीन उपायांवर काम करणं महत्त्वाचं आहे. यासाठी काही दीर्घकालीन ध्येय ठरवा, त्या ध्येयपूर्तीसाठी काम करा. सकारात्मक आधार असलेल्या या उद्दिष्टांवर काम करताना तुमचं मन आपोआप निरोगी राहील.

२- व्यायाम- व्यायाम केवळ तणाव कमी करत नाही, तर ते आत्मविश्वास देखील वाढवतं. सर्व प्रकारच्या चिंतांवर ते काम करतं. चालणं, धावणं, नृत्य करणं, जिममध्ये व्यायाम करणं यापैकी कोणत्याही प्रकारचं वर्कआऊट केल्यास नैराश्याच्या भावना दूर होतात.

३- जुन्या सवयी मोडा- नव्या कमिटमेंट्स करा आणि ज्या सवयी तुम्हाला मागे खेचत आहेत, त्या जुन्या सवयी मोडा. नव्या लोकांसोबत मैत्री करा, नवीन नाती तयार करा. गोष्टी करण्याच्या नव्या पद्धती विकसित करा. हे करणं सोपं नसलं तरी त्यासाठी प्रयत्न करताना नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

४- स्वत:साठी जगा- मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी तुम्हाला आनंदी राहण्याची खूप गरज आहे आणि त्यासाठी योग्य ते पाऊल उचलणं महत्त्वाचं असतं. इतरांचं मन राखण्यासाठी, इतरांना खूश राखण्यासाठी सतत त्याग किंवा तडतोड करू नका. स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी स्वतःला बळकट करा.

५- रिस्क घ्या- जर तुम्ही जीवनात कोणतीच जोखीम घेतली नाही तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही. जोखीम घेण्याची हिंमत तुमच्यात विकसित करून स्वतःला आव्हान द्यावं लागेल. मग ती नवीन नोकरी असो, नकारात्मक नातेसंबंधापासून दूर जाणं असो किंवा इतर कोणतीही जोखीम पत्करणं असो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top