Perfectionism : परिपूर्णतेचा अट्टहास

perfectionism vs excellence: परिपूर्णतेच्या अट्टहासामुळे ताण, अस्वस्थता आणि आत्मविश्वास कमी होतो; उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित केल्यास काम, नाते आणि मनाचे संतुलन राखता येते.
perfectionism vs excellence

perfectionism vs excellence

sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे,समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

खरं पाहिलं तर परिपूर्ण असं काहीच अस्तित्वात नाही. ते मानवी मनाने तयार केलेलं कल्पनारंजन आहे. निसर्ग आपल्याला हेच शिकवतो. कोणतंही पान दुसऱ्यासारखं नसतं, तरी झाड सुंदर दिसतं. लाटा एकसारख्या नसतात, तरी समुद्र वाहत राहतो. चंद्र कधी पूर्ण, कधी अपूर्ण असतो, तरी त्याचं अस्तित्व बदलत नाही. निसर्ग ‘परफेक्ट’ होण्याचा हट्ट धरत नाही.

‘हे अजून नीट झालेलं नाही’, ‘लोक काय म्हणतील?’, ‘एकदम परफेक्ट हवं,’ ही वाक्ये आपल्यापैकी अनेकांच्या मनात रोज कुठे ना कुठे उमटतात. घरात, ऑफिसमध्ये, मुलांच्या बाबतीत, अगदी स्वतःकडून असलेल्या अपेक्षांमध्येही. परिपूर्णतेचा अट्टहास बाहेरून शिस्त, जबाबदारी आणि गुणवत्ता वाटतो; पण आतून तो हळूहळू मानसिक थकवा वाढवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com