नवीन ठिकाणी नोकरी करणे होत असेल कठीण तर या गोष्टी नक्की करा

तणावपूर्ण स्थितीतून बाहेर पडून आपली कामगिरी सुधारण्यासाठी खालील गोष्टी नक्की करा...
new job
new jobgoogle

मुंबई : आपल्या स्वप्नातली नोकरी मिळणे ही आनंदाची गोष्ट असते; मात्र नव्या नोकरीचे ठिकाण, तेथील माणसे, कार्यसंस्कृती यांविषयी कुतूहलासोबतच हुरहूरही असते. या तणावपूर्ण स्थितीतून बाहेर पडून आपली कामगिरी सुधारण्यासाठी खालील गोष्टी नक्की करा...

new job
नवीन नोकरी शोधत आहात? कुठे जॉईन होत आहात? तर या गोष्टी ठेवा लक्षात

तुम्हाला ही नोकरी का करायची आहे ?

यामागे तुमची सकारात्मक इच्छाशक्ती असू शकते. तुम्हाला या प्रकारच्या कामाची आवड असू शकते किंवा भरपूर मेहनत करण्याची तयारी असू शकते.

स्व-व्यवस्थापन

स्व-व्यवस्थापनाचे कौशल्य अवगत असल्यास तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेचे व्यवस्थापन करू शकता. यामुळे तुम्हाला सर्व कामे वेळेत करणे शक्य होईल. तुमच्यातील नेतृत्वगुण दिसून येतील व तुमच्याशी कसे वागावे हे लोकांना कळेल.

प्राधान्यक्रम ठरवा

तुम्हाला कोणत्या कामाला महत्त्व द्यायचे आहे याचे प्राधान्यक्रम ठरवा. शारीरिक, मानसिक आणि भावनिक मर्यादा ओळखा आणि त्यावर काम करा. कामाच्या वेळा ठरवा आणि त्या पाळा. तुम्ही महत्त्वाच्या ईमेल आणि मेसेजेसना किती वेळात उत्तर देता याचे निरीक्षण करा. तुमच्या मर्यादांविषयी वरिष्ठांशी बोला.

क्षमतेचा योग्य वापर करा

फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असे म्हटले जाते. त्यामुळे वरिष्ठांसमोर आपली प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. यासाठी ते भरपूर काम करतात. याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमची क्षमता पद्धतशीरपणे वापरा.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com