
केसांमध्ये कोंडा आणि खाज होत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स
कोल्हापूर: उन्हाळा सुरू झाला की स्कैल्प सोबत फंगल इन्फेक्शन बरोबर केस देखील चिपचिप होऊ लागतात आणि मग सुरुवात होते डैंड्रफची. केसांमध्ये सतत येणारा ओलावा कोंडा तयार होण्यास कारणीभूत ठरतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खुप सार्या फंगल इन्फेक्शन होत असतात आणि यामुळेच केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्त वाढते. अशा वेळेस हेअर एक्सपोर्ट ची मदत घेऊन आपण केसांची काळजी घेऊ शकता.
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल थोडेसे हातावर घेऊन केसांच्या मुळापासून हलक्या हाताने लावून द्या. काही वेळासाठी केसांवर जेल तसेच राहू द्.या वीस मिनिटाने केस वॉश करून द्या. केस वॉश करत असताना तुम्ही तुमच्या नॉर्मल शाम्पूचा वापर करा.
एलोवेरा लावण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या
जर तुम्हाला खूप लवकर थंडी वाजत असेल किंवा ताप ,सर्दी येतो अशा वेळेस हे जेल वापरू नका. एलोवेरा जेव्हा थंड असते त्यामध्ये कॅस्टर आॅईल मिक्स करा आणि ते वापरू शकता.
मेथीच्या दाण्याचा वापर
मेथीचे दाणे रात्रीच्या वेळेस दोन चमचे एका बाऊलमध्ये भिजत ठेवा सकाळी त्याची पेस्ट बनवा
.ही पेस्ट तुमच्या केसांवरती हळू लावून घ्या.या पेस्टला स्कैल्पला लावून घ्या. केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर करा.
नारळाचे तेल आणि कापूर
ही एक हॉट हेअर थेरेपी आहे. तेलामध्ये कापूर टाका आणि हळू हळू संपूर्ण केसांना लावून द्या. सर तुमचा स्कैल्प ड्राय असेल आणि नारळाचे तेल सुट करत नसेल तरी याचा वापर करू नका.
निंबाचा वापर
निंबात खूप साऱ्या एंटी-बैक्टीरियल आणि एंटी-बैक्टीरियल प्रॉपर्टीज असतात. यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. यासाठी निंबाच्या पाल्याला पाण्याला रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मिक्सर मधून मिश्रण करून घ्या आणि केसांना लावा. केस वाॅश करत असताना निंबाच्या पाण्याचा वापर करा.
डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
Web Title: Follow Up If There Is Dandruff And Itching In The Hair Tips Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..