मैत्री आणि मैत्रीण या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे जसजसे आपण वयाच्या उत्तरार्धाकडे जातो, तसतसं आपल्याला या शब्दांचं अर्थ चांगल्या रीतीने कळू लागतात. आपली हक्काची जागा जिथं मन मोकळं करून हलकं वाटतं. मैत्रीच्या गोतावळ्यापेक्षा मनाला स्थैर्य देणारी, वेळोवेळी ‘तू लढ गं, मी आहे’ असं म्हणणारी एखादी मैत्रीही पुरते.