Be Happy: मनातून फुलणाऱ्या आनंदामागची 4 रसायनं

आपण आनंदी राहणे व चेहरा हसरा ठेवणे आवश्यक
Be Happy
Be Happyesakal
Summary

आनंद आणि सुखी जीवन मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात.

सध्या धकाधकीचे जीवन सुरु आहे. आयुष्यामध्ये आपल्याला अनेक चढउतार येत असतात. त्यावेळी आपल्याला अनेक संकटाशी सामना करावा लागतो. यातूनच आपोआपच आपल्या मनामध्ये निराशा येत असते. अशावेळी आपण आनंदी राहणे व चेहरा हसरा ठेवणे आवश्यक असते. अशावेळी आनंद आणि सुखी जीवन मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. जेव्हा आपल्या मनात निराशा दाटून येते, अशावेळी घडत असलेल्या चांगल्या गोष्टीही आपल्याला दिसत नाही. कितीही ठरवलं तरी आपण कायमस्वरूपी आनंदात आपोआप राहू शकत नाही. परंतु लहान मुलांचे असे नसते. लहान असेपर्यंत ती कायमच आनंदात असतात, मजेत असतात, त्यांना कसलीही चिंता नसते. ती असली तरी गुणधर्म असतो.

Be Happy
गृहिणींमध्ये वाढतोय मानसिक तणाव, आनंदी राहण्यासाठी या 5 टिप्स

आनंदी असणे चांगले असते. आनंदी असण्यासाठी आपल्या शरीरात चार प्रकारची रसायनं निर्माण होत असतात.

- डोपामाईन : कोणी कौतुक करणे आणि बक्षीस मिळाल्यामुळे डोपामाईन निर्माण होते.

- सेरोटोनिन : व्यायाम करून झाल्यावर शरीरामध्ये चांगली भावना निर्माण होते. तेव्हा सेरोटोनिन निर्माण होते.

- ऑक्सिटोसिन : प्रेम आणि विश्वास यामुळे ऑक्सिटोसिन निर्माण होते.

- एन्डॉर्फिन : एखाद्या वेदनेपासून किंवा दुःखापासून मुक्ती मिळते तेव्हा एन्डॉर्फिन निर्माण होते. मनाजोगता पदार्थ खायला मिळाला कीसुद्धा एन्डॉर्फिनच हजर होते.

Be Happy
टेंन्शन कसलं घेताय, ही चार कामं करा नेहमी राहाल आनंदी

या सर्व रसायनांच्या कामकाजावर अद्यापही मोठ्या प्रमाणावर संशोधन चाललेलं आहे. आपल्याला विविध कृतींमुळे आपण आनंद होतो. आपल्या लेखी त्या आनंदाने व्याख्या बरीचशी एकसारखीच असली तरी मेंदूमध्ये त्यासाठी चार रसायनांची योजना केलेली आहे. मग माणूस पुरेसा आनंदी का नाही? हे खरंय की लहान मुलांसारखी मोठी माणसं सदैव आनंदी राहू शकत नाहीत. पण काही चांगली कामे करून आनंद मिळवता नक्की येईल. यासाठी काय करायचे हे या रसायनांनीच सांगितलेलं आहे.

Be Happy
आनंदी, यशस्वी आयुष्यासाठी असलेले सोपे मंत्र

मजा केल्यामुळे मिळालेला आनंद आणि दु:खावर, ताणावर, अस्वस्थतेवर उत्तर मिळालं म्हणून होणारा आनंद, हे सारखेच असतात का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

उदा: आवडीचं आईस्क्रीम मिळाल्यावर होणारा आनंद, एखाद्या कोर्ट केसमधून सुटका झाल्यावर मिळणारा आनंद, घाम गाळत एखादं अवघड आव्हान पूर्ण केल्यावरचा आनंद आणि एखाद्या दिवशी काही न करता फक्त वेळ घालवला, या आनंदाच्या छटा वेगळ्या असतात. दु:ख आणि ताण यावर मात करून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.

दुसरं आणि महत्त्वाचं असे की, अमुक झालं की मी खूप समाधानी होईन. हे मिळालं की माझ्यासारखी सुखी मीच! असा आनंद सारखा लांबणीवर टाकण्याची गरज नाही. आनंद कशामुळे मिळतो ते शोधायचं आणि ते पुन्हा करायचं. आपल्याच तर मेंदूत, आपल्या अगदी जवळच याची रसायनं आहेत.

(संदर्भ: पुस्तक–मेंदूचा पासवर्ड, सकाळ प्रकाशन, लेखिका- डॉ. श्रुती पानसे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com