परफ्यूम घेताना 'या' चार गोष्टींचा विचार करा, होईल मोठा फायदा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four things are important while purchasing perfume for yourself

परफ्यूमचा वापर आजच्या काळात मोठा वाढला आहे. परफ्यूम विकत घ्यायला गेल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे त्याची माहिती जाणून घेऊया

परफ्यूम घेताना 'या' चार गोष्टींचा विचार करा, होईल मोठा फायदा 

कोणताही ऋतू असला तरी आपल्याला स्वतःच्या शरीराचा वास आलेला आवडत नसतो. घाम येणे किवा शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी जशी अंघोळ महत्त्वाची असते तशीच परफ्यूमही उपयोगाचे ठरते. त्यामुळे परफ्यूमचा वापर आजच्या काळात मोठा वाढला आहे. परफ्यूम विकत घ्यायला गेल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे त्याची माहिती जाणून घेऊया

1. पर्सनॅलिटीनुसार योग्य निवड करावी-

जर तुम्हाला योग्य परफ्यूम खरेदी करायचा असेल तर तुमच्या पर्सन्यालिटीचा एकदा विचार नक्की करा. नेहमी असा परफ्यूम निवडा जो तुमच्या पर्सन्यालिटीला शोभेल. म्हणजे जशी तुमची पर्सनॅलिटी आणि लाईफस्टाईलनुसार परफ्यूम निवडला तर उत्तम. जर तुमची पर्सन्यालिटी बोल्ड असेल तर तुम्ही हार्ड परफ्यूम वापरला चालू शकेल, पण याचा वापर उन्हाळ्यात कमी केला पाहिजे. जर तुमचा स्वभाव शांत आणि पर्सन्यालिटी लहान असेल तर तुम्ही परफ्यूम निवडताना तो लाइट घेतला तर तो योग्य असेल.

2. परफ्यूम घेताना शरीरावर चेक करा-

बरेच लोक परफ्यूमच्या ब्लॉटर पेपरवर मारूण त्याचा सुगंध पाहत असतात. पण ते काही प्रमाणात आपल्यासाठी तोट्याचं ठरू शकतं. कारण पेपरवर त्याचा सुगंध आणि शरीरावर वास वेगळा येत असतो. त्यामुळे बऱ्याचदा मुली किंवा दुसरं कोणही परफ्यूम घेताना फसतात. यासाठीच इथून पुढे परफ्यूम घेताना तो हातावर किंवा शरीरावर मारूण पाहिला पाहिजे नंतरच तो खरेदी करा.

3. बराच वेळ राहील सुंगंध-

जेंव्हा आपण परफ्यूम घेत असतो तेंव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजी ती म्हणजे लाँग लास्टींगचा विचार केला पाहिजे. जर तुम्हाला याबद्दल समजण्यास अडचणी येत असतील तर तुम्ही दुकानदाराची किंवा विक्रेत्यांची मदत घेऊ शकता. या श्रेणीत लवेंडर, वॅनीला आणि जॅस्मीन सर्वोत्तम मानलं जातं

4. उन्हाळ्यात हार्ड परफ्यूम टाळा-

परफ्यूम खरेदी करताना ऋतुमानाचा विचारही केला पाहिजे. उन्हाळ्यात हलका आणि फ्रेश सुगंधाचा परफ्यूम घेतला पाहिजे. जर हार्ड परफ्यूम या काळात वापरला तर त्याचा त्रास तुमच्या आसपासच्या लोकांना होत असतो.

संपादन- प्रमोद सरावळे 

loading image
go to top