
Hair Care Mask : अगदी झाडू सारखे केस सुद्धा भारी दिसतील, फक्त या टिप्सने...
Hair Care Mask : रेशमी, मॉइश्चराइज्ड केस असणं हे प्रत्येका मुलीचं स्वप्न असतं आणि खरं सांगायचं तर जर आपण आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेतली तर हे करणं खूप सोप्पं आहे. आता तुम्ही म्हणाल म्हणजे नक्की काय? सोप्पं आहे, कोणत्याही महागड्या पार्लर ट्रीटमेंट नाही फक्त एक केळं आणि काही पदार्थ आणि तुमच्या स्वप्नातले मऊ मुलायम केस खरंच सत्यात उतरतील. बघूया नक्की काय करायचं आहे?
१. केळी आणि अंडी हेअर मास्क
हा प्रोटीनने भरलेला हेअर मास्क आहे. तुम्हाला फक्त एक किंवा दोन पिकलेली केळी आणि एक अंड लागेल. केळी सालून मिक्सरमध्ये टाका आता त्यात अंड फोडून टाका आणि मग छान मिक्स करा, चुकूनही पाणी टाकू नका आणि केसांना लावा. सुमारे २० मिनिटांनी केस स्वच्छ धुवून टाका.
२. केळी आणि खोबरेल तेल मास्क
या मास्कने तुमच्या केसांना आवश्यक असलेले पोषण मिळेल. या मास्कसाठी, तुम्हाला २-३ चमचे खोबरेल तेल आणि १ किंवा २ पिकलेली केळी लागतील. केळी मॅश करुन घ्या आणि त्यात तेल टाकून छान मिक्स करा. मास्क लावा आणि नंतर सुमारे १५ ते २० मिनिटे राहू द्या.
३. केळी आणि मध हेअर मास्क
जर तुम्ही तुमच्या स्काल्पला कंडिशन करु इच्छित असाल, तर हा हेअर मास्क परफेक्ट आहे. याने तुमचे केस चांगले आणि मऊ होतील. या हेअर मास्कसाठी तुम्हाला एक चमचा मध आणि एक किंवा दोन पिकलेली केळी लागतील. दोन्ही पदार्थ ब्लेंडरमध्ये चांगले मिसळा आणि नंतर २० ते २५ मिनिटे लावा. हा मास्क डोक्यातील कोंडासुद्धा दूर करतो.
४. केळी आणि अर्गन ऑइल हेअर मास्क
हे दोन पौष्टिक घटक तुमचे केस मऊ मुलायम करतील याची खात्री आहे. अर्गन ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई असते जे केसांचे पोषण राखण्यास मदत करते आणि निरोगी स्काल्प राखण्यास मदत करते. या हेअर मास्कसाठी, तुम्हाला फक्त २ ते ३ चमचे आर्गन तेल आणि २ केळींची गरज आहे. आपल्या स्काल्पला मास्क लावा आणि धु३० मिनिटांनी धुवून काढा.