Friendship Day 2023: मैत्री असावी तर अशी ! फासावर चढतानासुद्धा मित्रांना मिठी मारण्याची होती शेवटची इच्छा l Friendship Day Special: Bhagat Singh Friendship Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friendship Day Special: Bhagat Singh Friendship Story

Friendship Day 2023: मैत्री असावी तर अशी ! फासावर चढतानासुद्धा मित्रांना मिठी मारण्याची होती शेवटची इच्छा

Friendship Day: भगत सिंग यांचं नाव घेताच आठवते ती त्यांची निस्वार्थ देशभक्ती आणि देशासाठी दिलेलं बलिदान. भगतसिंग यांचं जेवढं देशावर प्रेम होतं तेवढंच प्रेम त्यांचं त्यांच्या मित्रांवरही होतं. त्यांच्या मैत्रीचे किस्से ऐकून तुमच्या डोळ्यांतही पाणी तरळेल. दरवर्षी सगळे फ्रेंडशिप डे च्या दिवशी त्यांच्या जवळच्या मित्रांना भेटून किंवा त्यांना भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. मात्र भगत सिंगांच्या मैत्रीचा किस्सा तुम्ही ऐकलात तर मैत्रीचं खरं महत्व आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. (Friendship Day Special: Bhagat Singh Friendship Story)

माध्यमांनी शहीद भगत सिंग यांच्या भाच्याची पत्नी मंजीत कौरशी केलेल्या बातचितमध्ये तिने भगत सिंग यांच्या मैत्रीचा अनोखा किस्सा सांगितला. भगत सिंग यांच्या आयुष्यात मित्र आणि मैत्री यांचं फार महत्व होतं. सुखदेव, राजगुरू, बट्टूकेश्वर दत्त, शिववर्मा,जयदेव कपूर,भगवती चरण गौरा हे भगत सिंग यांचे जवळचे मित्र होते. एकमेकांसाठी जीव देण्यासही हजर असणारे मित्र आणि निस्वार्थी अशी या सगळ्यांची मैत्री होती.

भगत सिंग यांनी केली होती नौजवान सभेची स्थापना

फार कमी लोक आहेत ज्यांना भगत सिंग यांच्या नौजवान भारत सभेबद्दल माहितीये. भगतसिंग आणि त्यांच्या मित्रांनी मिळून या सभेची स्थापना केली होती. हळूहळू हजारो तरूण या सभेत सहभागी झाले.

भगत सिंग यांनी मित्रांसाठी केलं होतं उपोषण

स्वातंत्र्य लढ्यासाठी जेव्हा इंग्रजांनी भगत सिंग यांना तुरूंगात टाकलं तेव्हा त्यांच्या मित्रांना तुरूंगात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणापेक्षाही घाण जेवण दिल्या जात होतं. भगत सिंग यांना हे कळताच भगत सिंग त्याविरोधात उपोषणास बसले. त्यांच्या जिद्दीपुढे इग्रजांनाही झुकावं लागलं होतं. त्यांनतर तुरूंगात असलेल्या सगळ्या भारतीय कैद्यांना चांगलं जेवण मिळण्यास सुरूवात झाली होती.

शेवटच्या क्षणी जपली मैत्री

भगत सिंग यांची मैत्री आजही अजरामर आहे. २३ मार्च १९३१ रोजी जेव्हा भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासावर चढवण्यात येणार होते तेव्हा भगत सिंग यांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती. तेव्हा त्यांनी मित्रांना आलिंगण देण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मरता क्षणीही भगत सिंग यांनी त्यांची मैत्री जपली. त्यांच्या मैत्रीचा हा किस्सा अजरामर आहे. (Friendship Day)