कुंकू लावण्याच्या पद्धती प्रांताप्रमाणे आणि संप्रदायाप्रमाणे निरनिराळ्या असतात. आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू संस्कृतीमध्ये कपाळावर गोल किंवा उभं कुंकू लावणं हे शक्तिवर्धक समजलं जातं. यामुळे भ्रूमध्याच्या ठिकाणी असणाऱ्या आज्ञाचक्राची जागृती होते. गंध किंवा कुंकू लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.