

From Classical to Retro Hits: Why Gen Z Is Falling in Love with Vintage Music
sakal
डिजिटल युगात संगीताच्या आवडी-निवडींमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. 'जेन-झी' पिढी शास्त्रीय आणि जुन्या गाण्यांकडे आकर्षित होत असताना, मिलेनिअल्स (१९८१ ते १९९६ या काळात जन्मलेली पिढी) मात्र त्यांच्या ठराविक संगीत प्रकारालाच पसंती देत आहेत.
जागतिक स्तरावर रॅप कल्चरचा प्रभाव वाढत असतानाच तरुणांमध्ये जुन्या संगीताची नव्याने क्रेझ निर्माण झाली आहे. या बदलामागे सोशल मीडियावरील रील्स हे प्रमुख कारण असल्याचे संगीत तज्ज्ञांचे मत आहे.