

Gentle Parenting Protects Kids Against Depression: New Study
esakal
Positive Parenting: लहान वयात मुलांवर होणारे संस्कार आणि पालकांची त्यांच्याशी असणारी वागणूक मुलांच्या संपूर्ण भविष्यावर खोल परिणाम करते. 'युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डॅम' (University of Notre Dame) येथील मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन आणि प्रदीर्घ संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लहानपणी मिळणारे प्रेमळ, सकारात्मक आणि आधार देणारे पालकत्व (Gentle Parenting) मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरते आणि त्यांना किशोरावस्थेत नैराश्यासारख्या (Depression) गंभीर मानसिक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते.
'कम्युनिकेशन्स सायकॉलॉजी' (Communications Psychology) या जगप्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामध्ये ४६५ मुले आणि त्यांच्या पालकांचा तब्बल १५ वर्षे पाठपुरावा करण्यात आला. या संशोधनातील मुख्य निष्कर्ष आणि पालकांसाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे-