
Perfect Tea Recipe: अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप चहानेच होते. भारतातील तसेच जगभरातील लोक चहा पिण्याचे शौकीन आहेत. चहा हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक मानलं जातं. दरवर्षी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश चहाच्या इतिहास, संस्कृती आणि आर्थिक महत्त्वाबद्दल जागरूकता पसरवणे आहे.
प्रत्येक चहा प्यायला आवडतो, पण योग्य पद्धतीने चहा कसा बनवायचा हे माहिती नसते. चहा बनवताना सर्वात आधी पाण्यात आलं घालावे की दूध, हे बहुतेक लोकांना माहित नसतं. ज्यामुळे चहाला परफेक्ट चव येत नाही. यासाठी पुढील टिप्स नक्की लक्षात ठेवा.