esakal | ये दुरी सही जाए ना! कोरोना काळात गर्लफ्रेंडला भेटायच्या भन्नाट ट्रीक्स

बोलून बातमी शोधा

girlfriend not able to meet in corona these
ये दुरी सही जाए ना! कोरोना काळात गर्लफ्रेंडला भेटायच्या भन्नाट ट्रीक्स
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कलम १४४ लागू केला असून संचारबंदी व जमावबंदीदेखील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या कडक लॉकडाउन सुरु आहे. याकाळात अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नातेवाईक, मित्रपरिवार यांची भेट घेणं आता कोणालाही शक्य नाही. यामध्येच सध्या तरुणवर्गातून देखील नाराजीचा सूर उमटत आहे. त्यातच अनेक प्रेम युगुलांना त्यांच्या जोडीदाराला भेटता येत नाहीये. विशेष म्हणजे प्रत्यक्षात जरी जोडीदाराला भेटता येत नसलं तरीदेखील सोशल मीडिया किंवा अन्य काही हटके ट्रीक्स वापरुन नक्कीच आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडची भेट घेता येऊ शकते. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळातही आपल्या प्रिय व्यक्तीची भेट कशी घ्यायची याच्या काही हटके ट्रीक्स जाणून घेऊयात.

१. व्हिडीओ कॉल -

सध्याच्या काळात व्हिडीओ कॉल हे प्रभावी माध्यम ठरत आहे. दूर असलेल्या व्यक्तीशी थेट व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता येत आहे. ती व्यक्ती कशी आहे, काय सुरु आहे हे थेट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पाहता येतंय. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी थेट घराबाहेर पडण्याची आवश्यकता अजिबात नाही. त्याऐवजी घरी राहुनच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तुम्ही प्रियजनांना पाहु शकता व बोलूदेखील शकता.

२. मोबाईलचा वापर करा -

मोबाईल ही वस्तू कोणासाठीही नवीन राहिलेली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्हाला प्रिय व्यक्तीची आठवण येत असेल तर लगेच त्यांना फोन लावा आणि बोला.

हेही वाचा: डोळ्यांना लेन्स लावून अंघोळ करताय? मग आधी हे वाचा

३. नाराज गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचा रुसवा करा दूर -

कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून प्रत्येक जण घरात अडकून आहे. त्यामुळे या काळात अनेकांची भेट होत नाहीये. विशेष म्हणजे प्रत्यक्ष बोलणं होत नसल्यामुळे अनेकांमध्ये गैरसमजही निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे गैरसमज दूर करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे संबंधित व्यक्तीला एखादं गिफ्ट देणे. सध्याच्या काळात आपण प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही. मात्र, ऑनलाइन माध्यमातून एखादं गिफ्ट नक्कीच देऊ शकतो.

४. भावना व्यक्त करा -

तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कायम भेटण्याची गरज असतेच असं नाही. मेसेज, स्टेटसच्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करु शकता.