Summer Suncoat: उन्हाळ्यात ट्रेंडी सनकोटला तरुणींची पसंती: फॅशनसाठी केला जातोय अधिक वापर

Summer Suncoat: स्कीन फ्रेंडली मटेरिअल वापरून तयार होणारे ट्रेंडी सनकोट दिसतात छान आणि लक्षही वेधतात. म्हणूनच सनकोट फॅशन ट्रेंड म्हणूनही आता ओळखले जात आहेत.
Summer Suncoat:
Summer Suncoat:Sakal

Summer Suncoat: काही फॅशन ट्रेंड्स हे दैनंदिनीचा भाग होतात. उन्हाची तीव्रता आणि धुळीपासून बचाव करणारा ‘सनकोट’ ही आवश्यकता झाली आहे. केवळ उन्हाळ्यातच सनकोट वापरावा, हा ट्रेंड आता मागे पडला आहे. वर्षभरही सनकोट वापरले जातात. स्कीन फ्रेंडली मटेरिअल वापरून तयार होणारे ट्रेंडी सनकोट दिसतात छान आणि लक्षही वेधतात. म्हणूनच सनकोट फॅशन ट्रेंड म्हणूनही आता ओळखले जात आहेत.

भर उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनकोट घातल्यास त्वचेला इजा पोचत नाही. सातत्याने ‘टूव्हीलर’वर प्रवास करत असाल, तर सनकोट वापरणे अतिशय उत्तम. कारण तीव्र उन्हाचा सामना करताना सनबर्नचा धोका संभवतो. त्यातल्या त्यात पंजाबी ड्रेस, साडी घातल्यावरही हात, मान पूर्णपणे झाकले जात नाही.

उन्हाने त्वचा भाजल्यासारखी होते, काळपटपणा येतो किंवा त्वचेची आग होते. अशावेळी उन्हात बाहेर जाणे टाळता येत नसेल, तर सनकोटचा पर्याय उत्तम आहे. तीव्र उन्हाचा अंगावरच्या कपड्यांचा रंग हमखास कमी होतो. कपडे फेंट वाटतात. इथेही सनकोट उपयुक्त ठरतो. पॉलिस्टर मिक्स, पिअर कॉटन, कॉटन मिक्स या प्रकारच्या सनकोटमध्ये स्किन फ्रेंडली मटेरिअल वापरले जाते.

डॉट प्रिंट, हार्टशेप, ‘व्ही-नेक’, फुलांच्या नक्षीच्या प्रिंटच्या सनकोटवर जास्त भर आहे. तसे तर  सनकोटमध्ये पांढऱ्या रंगाला सर्वाधिक मागणी आहे. अलीकडे बेबी पिंक, पिस्ता, आकाशी, पीच, यलो या रंगांच्या सनकोटची खूप चलती आहे. त्यातल्या त्यात डॉट प्रिंटचे सनकोट जास्त उठून दिसतात. याशिवाय एकाच कलरच्या सनकोटचा आपला चाहतावर्ग आहे. पाच बटणांचे, दोन खिशांचे, समोरून बटणाऐवजी झिप, बाह्यांना फ्रील आणि पाठीमागे कॅप असलेले सनकोट चालतात. अलीकडे होजिअरी मटेरिअलच्या सनकोटचा ट्रेंड आहे. सुरवातीला केवळ गरज म्हणून आवश्यक असलेले सनकोट आता ट्रेंडी सनकोटही आवड म्हणून आवर्जून घेतले जातात.

Summer Suncoat:
Summer Care Tips: आहारातून घालवा उन्हाचा थकवा, स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थ ठरतात उपयुक्त

कपड्यांच्या संरक्षणाचा दुहेरी फायदा

होजिअरी सनकोट वेगवेगळ्या साइजमध्ये मिळतात. कॉटन सनकोटपेक्षा होजिअरी सनकोट थोडे वेगळे आहेत. ते उन्हात उत्तम आणि हिवाळ्यातही ऊबदार वाटतात. सनकोटची साइज व कपड्यांच्या टिकाऊपणामुळे ग्राहकांना हे सनकोट आवडतात, तसेच सनकोटमुळे कपड्याच्या संरक्षणासारखा दुहेरी फायदाही होतो, असे विक्रेत्यांनी सांगितले.

स्टायलिश सनकोट्स

पाच बटणांचे, दोन खिशांचे, समोरून बटणाऐवजी झिप, बाह्यांना फ्रील आणि पाठीमागे कॅप असलेले सनकोट बाजारात नव्याने दाखल झाले आहेत. साधारणपणे १५० ते ४०० रुपयांदरम्यान सनकोट उपलब्‍ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com