Global Day Of Parents: आज जागतिक पालक दिन, जाणून घ्या इतिहास अन् महत्व

Global Day Of Parents: आज जगभरात जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया.
Global Day Of Parents
Global Day Of ParentsSakal

Global Day Of Parents: मनातील ओळखणारी आई आणि भविष्य घडविणारा बाप माणूस म्हणजेच पालक. दरवर्षी १ जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आई- वडलींना शुभेच्छा देऊन, भेटवस्तू देऊन त्याच्यासाठी खास बनवू शकता.

पालकांना समर्पित हा दिवस साजरा करण्याची अधिकृत घोषणा २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत करण्यात आली होती. या दिवसा निमित्याने पालकांचा आदर करतात आणि आभार मानतात.

इतिहास

१९९४ मध्ये यूएन जर्नल असेंब्लीमध्ये सुरूवात झाली. पालकांचा सन्मान व्हावा म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. हा दिवस साजरा करण्याच्या कल्पनेला युनिफिकेशन चर्च आणि सिनेटर ट्रेंट लॉट यांनी पाठिंबा दिला होता आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सन २०१२ मध्येच, हा दिवस पालकांचा सन्मान म्हणून साजरा करण्यासाठी सर्वसाधारण सभेने निवडला होता.

जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

यादिनानिमित्याने मुलांच्या जीवनात पालकांचे महत्त्व सांगितले जाते. पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करण्यासाठी दिवसभर जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे, मैफिली आणि प्रदर्शनांचा समावेश आहे. जगभरातील पालकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या मुलांच्या जीवनात त्यांनी बजावलेल्या अद्भुत भूमिकेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

महत्त्व

पालकांनी आपल्या मुलांसाठी नेहमीच त्याग केला आहे आणि अनेक समस्यांना तोंड देऊनही ते आपल्या मुलांचे कोणतेही नुकसान होऊ न देता मोठे करतात. कौटुंबिक वातावरण केवळ पालकांमुळेच प्राप्त होते. आपण आपल्या पालकांचा आदर करणे आणि त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी त्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. त्यांना तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे याची जाणीव करून द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com