
Artistic Interpretation of Christianity and Islam in M. F. Husain’s Painting: काल उत्तम गुरुवार आणि गुड फ्रायडेची पूर्वसंध्या होती. क्रुसावरच्या मरणाला सामोरे जाण्याआधी या रात्री येशूने आपल्या बारा शिष्यांबरोबर आपले शेवटचे भोजन म्हणजे 'The Last Supper' घेतले.
मकबूल फिदा हुसेन यांनी आपल्या खास शैलीत रेखाटलेले 'द लास्ट सपर इन द रेड डेझर्ट' (2008) हे चित्र एक आगळीवेगळी कलाकृती आहे. हे चित्र एम. एफ. हुसेन यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील आहे. हुसेन यांच्या या चित्रात ख्रिश्चन आणि इस्लामिक संस्कृतीचा मिलाप दिसतो. चित्रात उंट, देवदूत आणि इतर अनेक प्रतिमा आहेत, त्याबद्दल केवळ कला समीक्षकच लिहू शकतील.