esakal | गौरीच्या सणाला हटके दिसायचाय ; या टिप्स करा फॉलो
sakal

बोलून बातमी शोधा

गौरीच्या सणाला हटके दिसायचाय ; या टिप्स करा फॉलो

गौरीच्या सणाला हटके दिसायचाय ; या टिप्स करा फॉलो

sakal_logo
By
अर्चना बनगे

गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही तास राहिले आहेत. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवात गौरीचा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा केला जातो. गौरी म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतिक असे मानले जाते. तीन दिवस साजरा होणार्‍या या सणाच्या मूळ नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जातात. आपल्या परंपरा आणि पद्धतीप्रमाणे गौरींचे वेगवेगळ्या प्रकारात पूजन केले जाते.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. तर देशस्थ लोकांमध्ये उभ्या गौरींची पूजा केली जाते. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. अश्या या गौराईला सजवण्यासाठी महिला खुप मेहनत घेतात. याचबरोबर जर गौरी सणाला तुम्हाला हटके लुक करायचा असेल तर तुमच्यासाठी या काही खास टिप्स..

-जर तुम्ही गौरी सणाला साडी घालणार असाल, तर त्यात काही ट्विस्ट करू शकता, तुम्ही त्यावर काही फुलेही घालू शकता. हे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवेल

-बांगड्या घालताना, तुम्ही मॅचिंग बांगड्या सोबत ट्रेंडी ब्रेसलेट देखील घालू शकता. आजकाल बाजारात अनेक सुंदर बांगड्या उपलब्ध आहेत. यामुळे तुमचा लुक आणखी उजळ होईल

-कंबरेवर साडीने परिधान केलेला कमरबंद पट्टा आणि लेहेंगा दोन्हीही घातला जाऊ शकतो. तुम्ही पण हे करून बघू शकता.

-साडीसोबत वेगवेगळ्या नेकलाइनसह ब्लाउज घालून आणि साडीने कट करून तुम्ही त्याला ट्रेंडी लुक देऊ शकता. नेहमी फिटिंग ब्लाउज घाला. याशिवाय बॅकलेस ब्लाउज देखील घालू शकता.

-डोळ्याच्या मेकअपमध्ये तुम्ही फक्त eyeliner किंवा अगदी हलकी काजळ लावू शकता. वेगळ्या लूकसाठी, काळ्या आयलाइनर ऐवजी, तुम्ही तुमच्या ड्रेसला मॅचिंग लाइनर लावू शकता.

- लिपस्टिकची काळजी घ्या. असो, लाईट शेड्स आजकाल फॅशनमध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या ओठांवर सारखीच शेड लावा. साडीसारखीच शेड ही पर्याय देखील वापरू शकता.

loading image
go to top