लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार! सरकारचा अफलातून फंडा | MP

लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार! सरकारचा अफलातून फंडा | MP

मुंबई : राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये प्रथमच वुमन वाइन शॉप (Woman Wine Shop) उघडले जाणार आहेत. हो हे खरं आहे. येत्या एप्रिल 2022 पर्यंत खास महिलांसाठीची दुकाने आपल्याला पाहता येतील.

फक्त महिलांसाठी, महिलांना आवडणारी मद्यविक्री

सरकारी तिजोरी भरण्यासाठी मध्य प्रदेश सरकार (madhya pradesh government) महिलांसाठीचे वाइन शॉप (Wine Shop) उघडण्याच्या तयारीला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश सरकार सुरुवातीला राज्यातील चार महानगरांमध्ये महिलांसाठीचे खास वाईन शॉप उघडणार आहेत. दिल्ली-मुंबई अशा मेट्रो सिटीच्या धर्तीवर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला असून या दुकानांमध्ये महिलांसाठीच्या सर्व ब्रँडची वाईन मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. या चार शहरांमध्ये भोपाळ, जबलपूर, इंदौर आणि ग्वाल्हेर अशा चार शहरांचा समावेश आहे. इथे फक्त महिलांसाठी, महिलांना आवडणारी मद्यविक्री केली जाईल.

लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार! सरकारचा अफलातून फंडा | MP
"एसटीचं विलिनिकरण होऊ शकतं, पण...";शरद पवारांनी व्यक्त केली भीती

मध्य प्रदेश सरकारतर्फे विशेष काळजी

महिलांना अगदी बिनधास्तपणे या वाइन शॉपचा आनंद घेता यावा, यासाठी मध्य प्रदेश सरकारतर्फे विशेष काळजीदेखील घेतली जाणार आहे. आगामी एप्रिल महिन्यापर्यंत ही दुकाने सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच महिलांसाठीचे हे वाइन शॉप मॉल्ससारख्या सुरक्षित ठिकाणी घडली जातील. जेणेकरून तेथे महिला सहजपणे पोहोचू शकतील आणि त्यांच्या सुरक्षेची काळजीही घेतली जाणार आहे.

उमा भारती आक्रमक

दरम्यान भाजपच्या उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारला दारुबंदीवरून घेरलं आहे. 15 जानेवारी 2022 पर्यंत सरकारनं दारुबंदी केली नाही तर सरकारविरोधात आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे उमा भारतींच्या या विरोधासमोर सरकारची योजना कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्वाचं ठरेल

लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार! सरकारचा अफलातून फंडा | MP
'3 पक्षाचे 3 मंत्री सकाळी येऊन सरकार खंबीर असल्याचं चेक करतात'

वाइन खरेदीसाठी महिलांना प्रोत्साहन

वाइन शॉपमध्ये येण्यासाठी तसेच वाइन खरेदीसाठी महिलांना प्रोत्साहन दिले जाईल. याकरिता वाइन फेस्टिवलचेही आयोजन केले जाऊ शकते. तसेच महिलांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या या वाइन शॉपला किती प्रतिसाद मिळतोय, याची चाचपणीदेखील मध्यप्रदेश सरकारतर्फे केली जाईल. त्यानंतरदरम्यान, सध्या तरी महसूल विभागाकडे यासंदर्भातील ठोस आदेश आलेले नसले तरीही येत्या काळात मध्य प्रदेशात वुमन वाइन शॉप दृष्टीस पडण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com