esakal | आता 'या' वेळेतच घ्या Green Tea अन् आजारांना करा छु मंतर
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रीन टी

आता 'या' वेळेतच घ्या Green Tea अन् आजारांना करा छु मंतर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

वजन कमी करण्यासाठी बरेच लोक ग्रीन टी चा वापर करतात. मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या ग्रीन टी मिळतात. ज्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर देखील असतात. यात असणाऱ्या घटकांमुळे शरीराला इंफेक्शन आणि सूज येण्यापासून दिलासा मिळतो. यात अँटी ऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या रोगप्रतीकारक क्षमतेला वाढवतात. अलीकडे ग्रीन टी ने कॅन्सर ही बरा होतो असे संशोधनात आले आहे. मात्र कोणतेही गोष्ट ही अतीप्रमाणात आणि योग्य वेळेत नाही घेतली की त्याचे दुष्परिणाम हे जाणवतातच. म्हणून ग्रीन टी ही वेळतच घेणे गरजेचे आहे. यासाठी नेमकी कोणती वेळ योग्य आहे जाणून घेऊया..

या वेळेतच प्या ग्रीन टी

दिवसाची सुरवात करण्यापूर्वी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. बऱ्याचदा असे होते की, वर्कआउट झाल्यानंतर आपण ग्रीन टी घेतो. ही पध्दत अतिशय चुकीची आहे. फॅट बर्न करण्यासाठी वर्कआउट सुरु करण्यापूर्वी ग्रीन टी घेणे गरजेचे आहे. यात कॅफीन असते पण कॉफीच्या तुलनेत याची मात्रा कमी असते. त्यामुळे कॉफी किंवा चहापेक्षा तुम्ही हर्बल ड्रिंक म्हणून एक कप ग्रीन टी घेऊन दिवसाची सुरुवात करू शकता.

असे होते नुकसान

आपण जर योग्य वेळेत ग्रीन टी नाही घेतली तर त्याचा शरीरावर वाईट परीणाम होतो. आणि यातून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की उल्टी होणे, पोटात दुखणे, झोप कमी होणे, पोटात गॅस होणे, जास्त युरीन होणे अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी वर्कआउट सुरु करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला एकदा घ्यावा.

असा होतो फायदा

ग्रीन टी मधुमेह रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. तसेच यामुळे चेहरा नितेज, सुंदर दिसण्यास मदत होते. शिवाय चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुतीपासून ही बचाव होतो.

loading image
go to top