Guru Ghasidas Jayanti 2024: गुरु घासीदास जयंती, जाणून घ्या सतनामी समाजाच्या इतिहासाची ओळख
Guru Ghasidas Jayanti 2024 : गुरु घासीदास जयंती १८ डिसेंबर रोजी साजरी केली जाते. ही जयंती छत्तीसगड राज्यातील प्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि समाज सुधारक गुरु घासीदास यांच्या जन्मदिनाच्या रूपात साजरी केली जाते.
गुरु घासीदास यांना सतनामी समाजाचा संस्थापक मानले जाते. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १७५६ रोजी छत्तीसगड राज्यातील बलौदाबाजार जिल्ह्याच्या कसडोल ब्लॉकमधील गिरौदपुरी गावात झाला.